राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धला सुरुवात पूमसे स्पर्धेत वसुंधराला सुवर्ण तर कौशिकला रौप्य पदक


कल्याण, प्रतिनिधी  :  तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि पालघर तायक्वांदो संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ३३ व्या स्पारिंग व ९ व्या पुमसे राज्यस्तरीय सीनियर  तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन पालघर विरार येतील ग्रीन पॅराडाईज रिसॉर्ट येथे करण्यात आले असून पहिल्या दिवशी पूमसे स्पर्धेमध्ये ठाण्याच्या वसुंधरा चेडे आणि आदर्श राजकर यांनी सुवर्णपदक व ६० वर्षा वरील गटात कौशिक गवालिया यांनी रौप्य तर मुंबई च्या गौरव  करगुटकर याने ४०  वर्षावरील गटात रौप्य पदक पटकावले.या स्पर्धेचे उद्घाटन आमदार क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार हितेंद्र ठाकूरतायक्वांदो  संघटनेचे उपाध्यक्ष अनिल झोडगे, महासचिव संदीप ओंबासे व मिलिंद पाठारेटेक्निकल कमिटीचे भास्कर करकेरासुभाष पाटीलप्रवीण बोरसे व अविनाश बारगजे  आदी मान्यवर उपस्थित होते. नामदेव शिरगावकर यांनी राज्य अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर आणि तब्बल ३ वषार्नंतर होणारी ही पहिलीच स्पर्धा असून या स्पर्धेला एक वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे तसेच या स्पर्धेत तायक्वांदोची सर्व हायटेक सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.


 

राज्यातील ३२ जिल्ह्यामधील   ७५० खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले आहेत. मुले आणि मुलींच्या पुमसे आणि स्पारिंग या दोन प्रकारात सिनियर गटात ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकास मेडल आणि प्रशस्तीपत्रे देण्यात येणार आहे. तसेच सांघिक विजेतेपदउपविजेतेपदतृतीय क्रमांक ही विजयी संघास दिले जाणार आहेत.  स्पर्धेचा अंतिम पारितोषिक वितरण समारंभ  डिसेंबर रोजी होणार असून यावेळी राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदारमा. विधानसभा अध्यक्ष व काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोलेआमदार क्षितीज ठाकूरमाजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिक दिले जाणार असल्याची माहिती अविनाश ओंबासे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments