डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक संवर्धन संस्था वतीने विद्यार्थ्यांना वही व पेन देऊन शुभेच्छा


डोंबिवली ( शंकर जाधव ) करोना रोगाच्या संकटामुळे गेल्या दीड-दोन वर्षांपासून संपूर्ण देशात लॉकडॉन असल्यामुळे शाळा कॉलेज पूर्ण पणे बंद होते.  काही महिन्यापूर्वी आठवी ते बारावीच्या शाळा व कॉलेज  महाराष्ट्र शासनाने करोनाचे नियम पाळून सुरू करण्याचे आदेश दिले होते. तर इयत्ता पहिली ते सातवीची शाळा  सुरू करण्याचे आदेश दिले आहे. 


         डोंबिवलीतील शांतीनगर विद्यामंदिर शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक संवर्धन संस्थेच्यावतीने राष्ट्रमाता शिक्षणाच्या आराध्य दैवत सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून विद्यार्थ्यांना वही, पेन, मास्क, फुलपुष्प  व चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अध्यक्ष रवीकिरण मस्के, खजिनदार निलेश कांबळे, सुरेंद्र ठोके,बाजीराव माने,रवी इंगोले, अर्जुन केदार हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments