बायको सोबत मौजमजा करण्यासाठी तो करायचा बाईक चोरी सराईत दुचाकी चोरट्यासह सहा गजाआड

■४० दुचाकीसह आठ लाखाचा मुद्देमाल हस्तगत चोरीच्या बाईक घेतल्यास नागरिकांवरही होणार गुन्हे दाखल – डीसीपी सचिन गुंजाळ...


कल्याण, कुणाल  म्हात्रे  : आपल्या लाडक्या बायकोसह मौजमजा करण्यासाठी पैसे कमी पडतात म्हणून महागड्या दुचाक्या चोरी करून विकणाऱ्या सराईत चोरट्याला मानपाडा पोलीसानी अटक केली आहे. दीपक सलगरे हा आपल्या एका साथीदारासह महागड्या दुचाक्या चोरी करायचा त्यानंतर  या दुचाक्या फायनान्स कंपन्यांकडून आणल्या असल्याचे भासवून  गरजूंना स्वस्तात दुचाकीचे आमिष दाखवून विकायचा, काही दुचाक्या भंगारवाल्याला विकायचा. 


            हा भंगारवाला दुचाकी तोडून भंगारात विकायचा. अखेर या टोळीचा परदाफाश करण्यात मानपाडा पोलिसांना यश आलं असून याप्रकरणी दीपक सलगरे सह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत कल्याण डीसीपी संजय गुंजाळ यांनी नागरिकांनी स्वस्त दुचाकीचा आमिषाला बळी पडून चोरी केलेल्या दुचाक्या विकत  घेऊ नये असं आवाहन नागरिकांना केलंय अन्यथा इथून पुढे अशा दुचाक्या विकत घेणाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा दिला आहे.


कल्याण डोंबिवली परिसरातील दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या .या चोरट्याच्या मागावर पोलिस होते. कल्याण परिमंडळ 3 मध्ये या या दुचाकी चोरट्याचा शोध घेण्यासाठी  स्वतंत्र पथके स्थापन केली होती. मानपाडा पोलिसांच्या पथकाने या परिसरात दुचाकी चोरी झालेले आहेत. त्या परिसरातील सीसीटीव्ही तपासून पाहिले. तसेच भंगाराच्या दुकानावर देखील निगराणी ठेवली. संशयितांवर बारीक नजर ठेवून पोलिसांनी दीपक सलगरे या चोरट्याला अंबरनाथ येथील पालेगाव येथे सापळा रचून अटक केली. दीपक विरोधात आजमितीला मानपाडा, कोळसेवाडीविठ्ठल वाडीअंबरनाथ, नारपोली, उल्हासनगर व कल्याण बाजारपेठ पोलिस ठाण्यात मोटरसायकलचे गुन्हे दाखल आहेत .


 अंबरनाथ पालेगाव येथे राहणारा दीपक सलगरे हा आपल्या लाडक्या बायकोसोबत मौजमजा करण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने त्याने मोटरसायकल चोरी सुरू केली होती. दीपक मोटरसायकल चोरी करायचा व ती मोटर सायकल त्याचा साथीदार राहुल डावरे यांच्या मदतीने नागरिकांना स्वस्त गाड्यांच्या आमिष दाखवून विकायचा. या गाड्या फायनान्स कंपनी मधून खेचून आणल्या आहेत असे आमिष  तो ग्राहकांना देत या चोरीच्या गाड्या त्यांच्या माथी मारत होता. तसंच काही गाड्या त्याने भंगार व्यवसाय करणाऱ्या  चिनमून चौहान उर्फ बबलू यांनादेखील विकल्याबबलू या गाड्या स्क्रॅप करून त्या धर्मेंद्र चौहान, समशेर खान, भैरवसिंग खरवड यांच्या मार्फत इतरांना विकत होता.


पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात अखेर यश मिळवले. याप्रकरणी पोलिसांनी दीपक सलगरे सह सहा जणांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी १७ दुचाक्या २३ दुचाक्यांचे  इंजिन, २८ इतर पार्ट्स, एक कटर मशीन असा आठ लाख 24 हजार यांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांनी याआधी देखील इतर ठिकाणी चोरी केली असल्याचा संशय पोलिसांना असून पुढील तपास मानपाडा पोलिस करत आहेत.  हि कामगिरी पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस स्टेशनचे वपोनि शेखर बागडेपोउपनिरी सुनिल तारमळे, पोना प्रशांत वानखेडेअशोक कोकोडेसुशांत तांबेपोशि संतोष वायकरतारांचद सोनवनेचंद्रकांत सोनवनेअशोक आहेर यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments