व्हेंचर कॅटलिस्ट्सची २०२१ मध्ये १७८ स्टार्ट - अप्समध्ये गुंतवणूक एकूण २०७ डिल्स करत वाढ दुप्पट केली ~


मुंबई, १७ डिसेंबर २०२१ : व्हेंचर कॅटलिस्ट्स ग्रुप या भारतातील आघाडीच्या सुरूवातीच्या टप्प्यामधील गुंतवणूक कंपनीने २०२१ मध्ये एकूण २०७ डिल्स करत वाढ दुप्पट केली आहे. तसेच कंपनीने या वर्षादरम्यान १७८ अद्वितीय स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली. मुंबईमधील गुंतवणूक कंपनी भारताचे पहिले व सर्वात सक्रिय सुरुवातीच्या टप्प्यामधील गुंतवणूक व्यासपीठ व्हेंचर्स कॅटलिस्ट्स आणि १०० दशलक्ष डॉलर्स अॅक्सेलेरेटर फंड ९युनिकॉर्न्स चालवण्यासोबत त्यांचे कार्यसंचालन पाहते.


      व्हेंचर कॅटलिस्ट्स ग्रुप देशातील स्टार्ट-अप गुंतवणूकीचे लोकशाहीकरण करण्यासाठी ओळखला जातो. कंपनीचा लहान भारतीय नगरे व शहरांमधील परिसंस्‍था प्रबळ करण्यावर भर आहे. जवळपास १५ टक्के स्टार्टअप्स याच नगरांमधून आहेत. यात सिल्वासामधील पीनट बटर ब्रॅण्ड मायफिटनेस, पणजीमधील न्युमॅडिक, लखनोमधील आयजीपीडॉटकॉम व कीरोस आणि भोपाळमधील अॅग्रीगेटर स्टार्टअपचा समावेश आहे. 


      व्हेंचर कॅटलिस्ट्स ग्रुपचे सह-संस्थापक व अध्यक्ष डॉ. अपूर्वा रंजन शर्मा म्हणाले, "महामारीमुळे सेवा डिलिव्हरीजमध्ये अनेक पोकळ्या निर्माण झाल्या आहेत, ज्या स्टार्टअप्स भरून काढत आहेत. आम्हाला अशा व्यवसायांना त्यांच्या विकासाच्या सुरूवातीच्या टप्प्यामध्ये पाठबळ देण्याची मोठी संधी आहे. गुंतवणूकीचा टप्पा पाहता मूल्यांकन आम्हाला लाभ प्राप्त करून देण्यामध्ये मदत करतात, ज्यामुळे आमच्या व्यवसाय विकासाला अनेकपटीने मदत होते."


      वर्षातील काही प्रख्यात गुंतवणूका आहेत ब्लूस्मार्ट, दुकान, क्लब, मेलोरा, काला गेटो, मित्रों टीव्ही, रेग कॉफी, पॉवर गमीज, कौटलूट, प्रेस्किण्टो, रिसॉल्व्ह एआय, टोक, झिंगबस, राऊंडलॅब्स व स्टेज. विभागामध्ये डीपटेक, बी२बी सास, फिनटेक, इन्शुअरटेक, एफअॅण्डबी, हेल्थटेक आणि मीडिया यंदा गुंतवणूकांमध्ये अग्रस्थानी होते.

 

Post a Comment

0 Comments