एस.एस.टी. च्या विद्यार्थ्यांची पथ नाट्य आणि नृत्य स्पर्धेत पुन्हा चमकदार कामगिरी


कल्याण, कुणाल म्हात्रे : विविध पथनाट्य आणि नृत्य स्पर्धांमध्ये नेहमी अव्वल स्थान पटकावणाऱ्या एस.एस.टी. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रातील त्यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. विद्यार्थी भारती या संघटनेतर्फे त्यांच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त  उल्काकल्लोळ हे  बालविवाह विरोधी अभियान राबविले गेले. याअंतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांचा विषय बालविवाह एक क्रूर प्रथा असा होता. यातील पथनाट्य आणि नृत्य स्पर्धेत एस.एस.टी. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.


पथनाट्य स्पर्धेत वरिष्ठ महाविद्यालयाच्या टीमने  प्रथम क्रमांक आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या टीमने द्वितीय क्रमांक पटकावला. तर नृत्य स्पर्धेमध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले. पथनाट्यासाठी विद्यार्थ्यांना हर्षल सूर्यवंशी यांनी तर नृत्यासाठी सॅम कांबळे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष आणि संस्थापक प्राचार्य डॉ पुरस्वानी, उपप्राचार्य डॉ खुशबू पुरस्वानी तसेच सर्व प्राध्यापक वर्ग आणि इतर विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments