अनधिकृत बांधकामे झाली पण मैदाने नाहीत.... शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांची खंत

 


डोंबिवली ( शंकर  जाधव ) विविध राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात.त्यासाठी नेतेमंडळींना राजकीय व्यासपिठ मिळत असून त्यावर शब्दिक फटकेबाजी केली जाते.पण खेळाडूंसाठी मैदाने नसल्याने आपल्या शहरातील खेळाडूंना मुंबई किंवा ठाणे शहरात जावे लागते.ज्या शहरात अनधिकृत बांधकामे झाली त्या शहरातील खेळाडूंना मात्र मैदाने मिळत नाही अशी खंत स्थायी समितीचे माजी सभापती तथा माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.


    डोंबिवली पूर्वेकडील कान्होजी जेधे ( भागशाळा ) मैदान येथे एसपी ग्रुपने फुट स्पर्धा आयोजित केली होती. यासाठी हा ग्रुप शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्याकडे गेले होते. खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून म्हात्रे यांनी त्यांना मदत केली.या स्पर्धेत मुलांचे १६ संघ तर मुलींचे ८ संघ सहभागी झाले होते. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी माजी नगसेवक म्हात्रे हे उपस्थित होते, यांसह युवा सेनेचे पदाधिकारी आशु सिंग,दुर्गेश चव्हाण यश अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हात्रे म्हणाले,डोंबिवलीतील खेळाडूंना खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध होणे आवश्यक आहे. मात्र अनधिकृत बांधकामे झाली पण मैदाने नाहीत.


    डोंबिवलीत मोठ्या प्रमाणात फुटबॉल प्रेमी आणि खेळाडू राहतात. खेळाडूंच्या या मागणीसाठी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी चर्चा करणार आहे. डोंबिवली पश्चिमेकडील एकमेव भागशाळा मैदानाला बंदिस्त करण्याचा काहींचे प्रयत्न होते. खेळाडूंना यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता. राजकीय खेळांबाबत म्हात्रे यांना विचारले असता ते म्हणाले, केडीएमसीच्या आगामी निवडणुकीत शिवसेनाचा हाराजकीय खेळ जिंकेल असा विश्वास व्यक्त केला.

 

चौकट

 डोंबिवली पश्चिमेकडील कान्होजी जेधे ( भागशाळा ) मैदानात स्पर्धा आयोजीत केल्यास महिला खेळाडूंना चेंजिंग रूम असणे आवश्यक आहे. यासाठीही पालिका प्रशासनाकडे मागणी करणार आहे.तर डोंबिवली पूर्वेकडील क्रीडा संकुल येथील बंदिस्त सभागृहात बुद्धीबळ,कॅरम, बटमिंटन,टेनिस कोर्टची सोय केली असून त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.या प्रस्ताव शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी स्थायी समितीचे सभापती असताना सादर केला होता.

Post a Comment

0 Comments