अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीतर्फे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी


कल्याण, प्रतिनिधी  : सामाजिक, सांस्कृतिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती कल्याण या संस्थेच्या वतीने स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती वंजारी भवन कल्याण येथे उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष शंकरराव आव्हाड व सल्लागार माधवराव आव्हाड यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून गोपीनाथ मुंडे यांच्या त्यांना आलेल्या अनुभवाच्या आठवणींना उजाळा दिला. उपस्थितांनी मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून श्रद्धांजली अर्पण केली व आपल्या भावना व्यक्त केल्या.


यावेळी समाजातील शैक्षणिक सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरोणाच्या नियमांचे पालन करून हि जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना सरचिटणीस अर्जुन डोमाडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. रामनाथ दौंड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता महिला शाखा अध्यक्षा लता पालवे, वंदना सानप व तसेच युवाशाखा  अध्यक्ष संग्राम घुगेवंजारी बांधिलकी वधुवर मंडळाचे अध्यक्ष निवृत्ती घुगे यांनी विशेष परिश्रम घेतले.


या वेळी दिनांक १९ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वा अभिनव विद्या मंदिर कल्याण येथे समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वधू वर सूचक मेळावा कार्यक्रमात जास्तीत जास्त वधू वर यांनी सहभागी व्हावे असे आवाहन आत्माराम फड, निवृत्ती घुगे यांनी केले.

Post a Comment

0 Comments