केडीएमसीच्य मलशुद्धीकरण केंद्रात ऑनलाइन मॉनिटरिंग सिस्टीम युनिट कार्यान्वीत मलप्रक्रिया अंती तपासली जाणार पाण्याची गुणवत्ता


कल्याण, प्रतिनिधी  :  केडीएमसीच्य मलशुद्धीकरण केंद्रात ऑनलाइन मॉनिटरिंग सिस्टीम युनिट कार्यान्वीत करण्यात आले असून मलप्रक्रिया अंती पाण्याची गुणवत्ता तपासली जाणार आहे.  


 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील आधारवाडी मलशुद्धीकरण केंद्र व बारावे मलशुद्धीकरण केंद्र या दोन ठिकाणी मलप्रक्रिया अंती तयार होणाऱ्या पाण्याची गुणवत्ता तपासणी करण्याकरिता आता ऑनलाइन मॉनिटरिंग सिस्टीम युनिट कार्यान्वीत करण्यात आली आहे. त्याचा शुभारंभ "राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाचे" औचित्य साधून करण्यात आला. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व शहर अभियंता सपना  कोळी -देवनपल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ देखरेखीखाली कार्यान्वित करण्यात आलेल्या या यंत्रणेमुळे ऑनलाईन सिस्टीमद्वारे मल प्रक्रिया अंती तयार होणाऱ्या पाण्याची गुणवत्ता तपासणी व याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संकेत स्थळावर ऑनलाइन लिंक होणार आहे.


 

या यंत्रणेमुळे मलशुद्धीकरण विहित पॅरामिटर (मापदंडाप्रमाणे) प्रमाणे होत असल्याचे संनियंत्रण राहणार आहे. त्याचा डेटा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण यांच्या वेब पोर्टलवर उपलब्ध होईल. राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाचे औचित्य साधून तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महापालिकेच्या विद्युत विभागा मार्फत महापालिका मुख्यालयात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व शहर अभियंता सपना कोळी- देवनपल्ली आणि इतर कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच महापालिकेच्या अड या प्रभाग कार्यालयात तेथील अधिकारी/ कर्मचारी वर्गाच्या उपस्थितीत राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाच्या जनजागृतीपर भित्ती फलकाचे अनावरण करण्यात आले.  यावेळी विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी प्रदूषणामुळे भेडसावणा-या होणाऱ्या समस्या बाबत आणि त्यावर करावयाच्या उपाययोजना बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments