स्मार्ट सिटीच्या कामात भ्रष्टाचार -सचिन शिंदे यांचा आरोप


ठाणे, प्रतिनिधी : ठाणे महापालिका करित असलेले स्मार्ट सिटी अंतर्गत चालू असलेल्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात येत असल्याचा  आरोप ठाणे शहर काॅग्रेसचे प्रवक्ते सचिन शिंदे यांनी केला.


             कालच केंद्रीय मंत्र्यानी स्मार्ट सिटीच्या कामाची चौकशी करण्याचा सूचना दिल्या असताना आज जिल्हा काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन शिंदे यांनी ठाण्यातील प्रभाग क्रमांक 22 मधील दादोजी कोंडदेव स्टेडियम समोरील रस्त्यावर फूटपाथवर सुरू असलेल्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला फूटपाथवर जे काम चालू आहे तो मुळातच सुस्थितीत होता चांगले असलेले फूटपाथ तोडून त्यावर थोडेसे काम करून डागडुजी करत असल्याचे लक्षात आणून दिले फूटपाथखाली नाला नसतानाही त्यावर गटारांची झाकणे बसविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


         एकीकडे स्मार्ट सिटी मार्फत चांगली कामे व्हावेत अशी अपेक्षा असताना सुस्थितीत असलेले फूटपाथ तोडून नव्याने फूटपाथ बनविण्यात येत असल्याचा आरोप सचिन शिंदे यांनी केला बाजूलाच स्टेडियम समोरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत असताना या रस्त्याचे काम करणे अपेक्षित असताना तिथे मात्र दूर्लक्ष केले जात असल्याचे त्यांनी सांगितले केंद्र सरकारने दिलेला निधी नको त्या ठीकाणी व आवश्यकता नसतानाही वापरला जात असल्याचे त्यांनी या प्रसंगी सांगितले ठाणे महापालिकेने हे चालू असलेले कामाची त्वरित पाहणी करावी व चुकीच्या माहितीच्या आधारे चांगले फूटपाथ तोडून नव्याने फूटपाथ करून स्मार्ट सिटीच्या निधीचा पैसा ठेकेदार लाटत असल्यामुळे या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी सचिन शिंदे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments