पंचायत राज्य मधील महिला लोक प्रतिनिधीना प्रशिक्षण


कल्याण , प्रतिनिधी : महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद ठाणे  व एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कल्याण ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद सेस फंडातुन पंचायत राज्य मधील महिला लोकप्रतिनिधी प्रशिक्षण व  महिला मेळावा कार्यक्रम शिरढोण येथील सभागृहात संपन्न झाला.


या कार्यक्रमासाठी महिला बाल कल्याण सदस्य जयश्री सासेजिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, पंचायत समिती  उपसभापती भरत भोईरअंगणवाडी पर्यवेक्षिका उषा लांडगे, मुख्याध्यापिका काजळेसह शिक्षिका संगीता ठुबे,   जाधव सर व शिरोशे सरअध्यक्ष प्रहार दिव्यांग संस्था सरपंच शिरढोण अरुणा पाटील, भरत पाटील, योगेश म्हात्रे ग्राम.पं.सदस्य शिरढोण तसेच इतर गावातील महिला सदस्य,कृषी सखी,महिला बचत गटातील अध्यक्षसचिव, अंगणवाडी कार्यकर्त्या यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


यावेळी मीनल बाने यांनी पंचायत राज्य संस्था मधील महिलांची भूमिका आणि अधिकार या बाबत प्रशिक्षण दिले. मानस उपचार तज्ञ सिद्धी देशपांडे यांनी राजकारण, घर व इतर जबाबदाऱ्या  सांभाळताना येणाऱ्या मानसिक ताणतणावाचे व्यवस्थापन कसे करावेयाबाबत प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत महिलांची रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. तसेच अपंग महिलाना जिल्हा परिषदेच्या  विविध योजनांची माहिती दिली. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण देखील करण्यात आले.

Post a Comment

0 Comments