भिवंडीत गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ, पोलीस उपायुक्त पदी आयपीएस अधिकारी देण्याच्या मागणीला वाढला जोर..


भिवंडी : दि.31 (प्रतिनिधी )  अति संवेदशील समजल्या जाणाऱ्या भिवंडी परिमंडळ 2 अंतर्गत क्षेत्रात गुन्हेगारी घटनां मध्ये मोठ्या प्रमाणात  वाढ झाली असल्याने  भिवंडीला सक्षम आयपीएस अधिकारी नेमण्याच्या मागणीला जोर वाढला आहे.
         

          सन 2021 मध्ये 22 हत्याचे गुन्हे नोंद .तर दरोड्याच्या घटनेत मागील वर्षीच्या तुलनेत 25 ने वाढ  होत 77 वर पोहचली,घरफोडीच्या घटनेत 25 ने वाढ होऊन 147 तर वाहन चोरीच्या घटनेत 64 ने वाढ झाल्याने ती संख्या 462 वर पोहचली .तशीच 64 ने वाढ चोरीच्या गुन्हयात होत ती संख्या 562 वर पोहचली आहे .


          भिवंडी परिमंडळ क्षेत्रात दरोड्याच्या 77 गुन्हे घडले  असून चैन स्नॅचिंगच्या 25 घटनांचा समावेश असून त्यामध्ये अवघ्या 7 गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली आहे.दिवसा 34 तर रात्रीच्या अंधारात तब्बल 113 घरफोडीच्या घटना घडल्या असून वाहन चोरीने नागरिक धास्तावले असताना वर्षभरात 462 वाहन चोरीचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत त्यामध्ये 360 दुचाकी ,79 हलकी तर 24 अवजड वाहनांचा समावेश आहे .


          या गुन्हेगारी घटनां सह बलात्कार ,अपहरण,
विनयभंग यामध्ये विशेषतः अल्पवयीन पिडितां वर अन्यायाच्या घटना वर्षभरात वाढल्याचे दिसून येत आहे. वर्षभरात 56 बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद असून त्यामध्ये 16 पीडितांचा समावेश आहे विनयभंगाचे 83 गुन्हे असून त्यामध्ये 58 अल्पवयीन पीडितांचा समावेश आहे .


         भिवंडी परिसरातील गोदाम पट्ट्यात सहज काम उपलब्ध होत असताना अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनेत मागील वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढ झाली आहे.अल्पवयीन पीडितांच्या अपहरणाच्या नोंद झालेल्या 150 घटनांमध्ये 38 मुलांचा तर 112 मुलींचा समावेश असून अजून ही 21 जणांचा शोध लागला नसून त्यामध्ये 17 अल्पवयीन मुलींचा समावेश आहे .तर  दारूबंदीचे 116 व मटका जुगार खेळणाऱ्यां विरोधात 59 गुन्हे नोंद झाले आहेत.


        हुंडा प्रतिबंधक कायद्या अंतर्गत 84 गुन्हे दाखल असून ,हुंड्याची मागणी करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचे 7 तर हुंड्यासाठी हत्या केल्याच्या एका गुन्ह्याची नोंद आहे .फसवणुकीचे 72 गुन्हे दाखल असून त्यापैकी 33 गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे.तर सरकारी कामात हस्तक्षेप करण्याच्या 12 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत .


         हा सर्व गोषवारा पहिला असता 2020 या  मागील वर्षीच्या गुन्हे टाळेबंदावर नजर टाकल्यास लॉक डाऊन काळात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली असताना 2021 मध्ये 14 डिसेंबर पर्यंत घडलेल्या गुन्ह्यांची नोंद बघितल्यास पोलीस उपायुक्त या पदावर सक्षम  आयपीएस अधिकारी हवा असल्याची मागणी जोर धरू लागली आहे..

Post a Comment

0 Comments