वक्तृत्वाची गुरुकिल्ली पुस्तकाचे साहित्य संमेलनात प्रकाशन


डोंबिवली  ( शंकर जाधव )  ज्ञानदीप विद्यामंदिर शाळेतील शिक्षक हेमंत नेहते लिखित वक्तृत्वाची गुरुकिल्ली या पुस्तकाचे प्रकाशन नाशिक येथे झालेल्या 94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात सुप्रसिद्ध निवेदक तथा साहित्यिक रवींद्र मालुंजकर यांच्या हस्ते चंद्रकांत महामिने प्रकाशन कट्ट्यावर पार पडले.    

           
          अक्षरमंच प्रकाशनच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला अक्षर आनंदचे डॉ. योगेश जोशी, व्यास क्रिएशनचे निलेश गायकवाड, महाराष्ट्र पत्रकार संघाच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य राजेंद्र गोसावी, समाजसेवक निशिकांत महांकाळ, हार्दिका नेहते आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन प्रकाशन कट्टा समिती सदस्य उपस्थित होते.
     

           या संमेलनात सदर पुस्तकास उत्तम प्रतिसाद मिळाला असून पानिपतकार विश्वास पाटील, ख्यातनाम लेखक प्रवीण दवणे, ज्येष्ठ साहित्यिक महेश केळुसकर, ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे, सुलेखनकार अच्युत पालव, आदी मान्यवरांनी या पुस्तकासह लेखक हेमंत नेहते यांचे कौतुक केले. सदर पुस्तकास ख्यातनाम ज्योतिष्यकार तथा साहित्यिक ॲड. सोपान बुडबाडकर यांची प्रस्तावना लाभली असून निवेदक तथा लेखक डॉ. योगेश जोशी यांच्या अभिप्राय लाभला आहे.


        हेमंत नेहते यांच्या या पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल ज्ञानदीप विद्यामंदिर शाळेचे अध्यक्ष सतिश देसाई, सेक्रेटरी समीर देसाई, उपाध्यक्षा शिवानी देसाई, प्रविणा देसाई, मुख्याध्यापिका माधवी कदम, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक वासुदेव बऱ्हाटे, निता नेहते, आदींनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments