श्री दत्त जन्मोत्सवातून शिवसेनेची सामाजिक बांधिलकी दहा महिन्यांच्या चिमुकलीच्या शस्त्र क्रियेसाठी देणार एक लाखांची मदत

 


कल्याण, कुणाल  म्हात्रे  : विविध सण, उत्सव, समारंभ यातून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कल्याण मधील शिवसेना रामबाग प्रभाग क्र. ३८ च्या वतीने शनिवारी साजऱ्या होणाऱ्या श्री दत्तजन्मोत्सवात देखील सामाजिक बांधिलकी जपली जाणार आहे. कल्याण मधील दहा महिन्यांच्या चिमुकलीच्या लिवर शस्त्रक्रियेसाठी शिवसेना महानगर प्रमुख विजय साळवी यांच्या पुढाकाराने एक लाखांची मदत दिली जाणार आहे.  


कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात रहाणाऱ्या १० महिन्यांच्या दिविशा चौहान या लहान बाळाला जन्मजात लिवरचा आजार आहे. त्यासाठी तिला कोकिलाबेन धिरूभाई अंबानी हॅास्पिटल येथे लिवर ट्रांसप्लांट सर्जरी करावी लागणार आहे. या सर्जरीचा खर्च २० लाख इतका आहे. त्यामुळे बाळाच्या लिवर शस्त्रक्रियेसाठी एक लाखाची मदत शिवसेना आयोजित श्री दत्तजन्मोत्सवा तर्फे शनिवारी श्री दत्तजयंतीच्या दिवशी देण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना महानगर प्रमुख विजय साळवी यांनी दिली.

Post a Comment

0 Comments