भिवंडीतील आलिमघर बेटावरील गावठी दारूच्या हातभट्या उध्वस्त; लाखोंचा मुद्देमाल जप्त


भिवंडी,दि,18प्रतिनिधी, नववर्षाचे  स्वागत म्हटलं तर तळीरामांना दारू ढोसण्याची  संधीचयाच संधीचा फायदा घेत  दारू माफियांनी  नववर्षाच्या तोंडावर  भिवंडी तालुक्यातील खाडी किनारी  असलेल्या आलिमघर बेटावर मोठ्या प्रमाणात गावठी दारूच्या बेकायदा भट्या सुरु केल्याचे समोर आलेमात्र नारपोली पोलिसांनी दारू माफियांच्या बेटावरील  दारूच्या भट्ट्यावर धाड टाकून सर्वच हातभट्या उधवस्त करीत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला.

 

 

चार दारू माफियांवर विरोधात गुन्हा .. 


         चार दारू माफियांवर विविध कलमानुसार नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाअविनाश पाटील (रा.अलिमघरता.  भिवंडी,)  दिलीप सोनू पाटील,  योगेश नारायण पाटील, ( दोघे रा.  अळूर गाव,) आणि    मनोहर सखाराम पाटील रा.अंजूरता.  भिवंडी,) असे गुन्हा दाखल झालेल्या दारू माफियांचे नाव आहे

 


खबऱ्यामुळे दारू माफियांचा पर्दाफाश .. 


       भिवंडी शहर हे कामगारांचे शहर म्हणून ओळखले जातेशिवाय ग्रामीण भागात असलेल्या गोदाम पट्यातही लाखो कामगार काम करतातमात्र त्या कामगार असलेल्या  तळीरामांना विदेशी दारू महाग पडत असल्याने त्यांचा कल  स्वतःत मिळणाऱ्या गावठी दारूकडे असतोयामुळे ग्रामीण भागातील  खाडी किनाऱ्यासह जंगलात मोठ्या प्रमाणात दारू माफियांनी हातभट्या सुरु केल्या.        त्यातच नारपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चेतन पाटील  पोलीस उपनिरीक्षक रोहन  शेलार  यांना  खबऱ्यामार्फत  माहिती मिळाली किआलिमघर बेटावर असलेल्या जगंलात मोठ्या प्रमाणात  गावठी हातभट्टीची दारू उत्पादन करण्याच्या भट्टया लावून गावठी हातभट्टीची दारू विक्री केली जात असल्याची माहिती मिळालीया माहितीच्या आधारे पोलीस पथकाने खाडीतुन बोटीने प्रवास करीत  बेटावर पोहचत गावठी दारू हातभट्याचे स्थळ गाठले.  

 


3, लाख 86, हजारांचे  साहित्य जप्त.. 


पोलीस पथकाने  घटनास्थळी पंचानाम करीत सुमारे  तास याठिकाणच्या  गावठी हातभट्टीसाठी लागणारे  प्लास्टिकचे ड्रम त्यामध्ये असलेले साहित्यसह चारी हातभट्यां उधवस्त केल्याशिवाय एकूण 3, लाख 86, हजारांचे  साहित्य जप्त करून चार दारू माफिया विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे

Post a Comment

0 Comments