महपरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीची प्रतिकृती उभारून, डोंबिवलीत महामानवाला अभिवादन


डोंबिवली ( शंकर जाधव ) करोना रोगाच्या महामारी व ओमीक्रोन विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्य शासनाद्वारे विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. कोरोना नियमाचे पालन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करावे असा आदेश जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दादर येथे होणारी गर्दी टाळण्यासाठी व बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी डोंबिवलीत अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  


           डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक संवर्धन संस्था, डोंबिवलीच्या वतीने  दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमीची प्रतिकृती उभारून मानवंदना देण्यात आली. संस्थेच्यावतीने धम्म वंदना व अभिवादन करून कार्यक्रम समाप्त करण्यात आला. या कार्यक्रमाला डोंबिवलीतील विविध राजकीय , धार्मिक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी , कार्यकर्ते तसेच आंबेडकर अनुयायी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


        कोरोनाचे सर्व नियम पाळून शिस्तीत व शांततेत कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष रवीकिरण मस्के सर,   सरचिटणीस गौतम सुतार,  खजिनदार निलेश कांबळे , पदाधिकारी सुरेंद्र ठोके, मिलिंद साळवे, योगेश सुतार,विजय इंगोले, राजेश सोनवणे, उमेश सुतार, रवी इंगोले इत्यादींनी प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments