स्पोर्टींग क्लब कमिटी उपांत्य फेरीत


ठाणे, प्रतिनिधी  : अवांतर धावांची उपयोगी जोड मिळाल्यामुळे स्पोर्टींग क्लब कमिटीने दहिसर स्पोर्ट्स क्लबचा ३ विकेट्सनी पराभव करत डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित अर्जुन मढवी स्मृती महिला टी २० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले.


        सेंट्रल मैदानावर खेळलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दहिसर स्पोर्ट्स क्लबने २० षटकात ४ बाद ११४ धावसंख्येचे आव्हान उभे केले. या धावसंख्येत एकट्या राधिका ठक्करचा ५८ धावांचा वाटा होता. राधिकाने तब्बल आठ चौकारानिशी हि स्पर्धेतील सलग तिसरी अर्धशतकी खेळी साकारली होती. मानसी चव्हाण आणि निशा आम्ब्रेने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला, या आव्हानाचा पाठलाग करताना घरच्या मैदानावर खेळणारा स्पोर्टींग क्लब कमिटीचा संघ चांगलाच अड़चणीत आला होता. 


         पण दहिसर स्पोर्ट्स क्लबच्या गोलंदाजांनी विकेट्स मिळवूनही चेंडूवर नियंत्रण न राखल्याने त्यामुळे मिळालेल्या अवांतर धावांचा फायदा प्रतिस्पर्धी संघाला मिळाला. स्पोर्टींग क्लब कमिटीने १८ षटकात ७ बाद ११६ धावा स्पर्धेच्या उपांत्य फेरीतले स्थान पक्के केले. गोलंदाजीप्रमाणे फलंदाजीतही छाप पाडताना निव्याने १७, ख़ुशी ठक्करने १२ आणि निधी दावाडाने ११ धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात आपल्या खात्यात एच विकेट्स जमा करणाऱ्या बतुलने या सामन्यात ३, प्रियंका गोलीपकर आणि सौम्या सिंगने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. सामन्यात राधिकाची सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. 


          अन्य लढतीत विजय क्रिकेट क्लबने कामत मेमोरियल क्रिकेट क्लबचा ७ विकेट्सनी पराभव केला, स्पर्धेच्या ड गटातील केवळ औपचारिकता ठरलेल्या सामन्यात कामत मेमोरियल संघाने २० ६ बाद ११८ धावा केल्या होत्या. साध्वी संजय (२४), प्रांजल गुरव (२३) आणि मिताली म्हात्रेने १७ धावा केल्या. जान्हवी काटेने २, प्रेरणा परब, अंजली जैस्वार आणि जाग्रवी पवारने प्रत्येकी एक विकेट मिळवली. उत्तरादाखल विजय क्रिकेट क्लबने विजयाचे लक्ष्य विसाव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर ३ फलंदाजांच्या मोबदल्यात १२१  धावा करत पूर्ण केले. आक्षी गुरव आणि क्षिश निर्मलने प्रत्येकी एक विकेट मिळवली. या सामन्यात जाग्रविला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. 


संक्षिप्त धावफलक :

        दहिसर स्पोर्ट्स क्लब : २० षटकात ४ बाद ११४ (राधिका ठक्कर ५८, मानसी चव्हाण ४-२९-१, निव्या आंब्रे ३-१७-१) पराभूत विरुद्ध स्पोर्टींग क्लब कमिटी : १८ षटकात ७ बाद ११६ (निव्या आंब्रे १७, ख़ुशी ठक्कर १२, निधी  दावडा ११, बतुल परेरा ४-३०-३ प्रियंका गोलीपकर ४-२१-२, सौम्या सिंग २.५-१८ -२ ) कामत मेमोरियल क्रिकेट क्लब : २० षटकात ६ बाद ११८ (साध्वी संजय २४, प्रांजल गुरव २३, मिताली म्हात्रे १७, जान्हवी काटे ३-११-२ ) पराभूत विजय क्रिकेट क्लब : १९.३ षटकात ३ बाद १२१ (जाग्रवी पवार नाबाद ३९, जयश्री भुतिया नाबाद ३९)

Post a Comment

0 Comments