विजय हजारे ट्रॉफीच्या सामनासाठी दादोजी कोंडदेव स्टेडियम सज्ज प्रशासनाच्या वतीने अत्यावश्यक तयारी पूर्ण

■ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमचे छायाचित्र...


ठाणे,  प्रतिनिधी :  ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर यंदा पाहिल्यांदाच होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीच्या रणजी सामनासाठी  अत्यावश्यक असणारी डागडुजीची सर्व कामे पूर्ण झाली असून संपूर्ण स्टेडियम क्रिकेटच्या सामन्यासाठी सज्ज आहे.


      महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या सूचनेनुसार क्रीडा अधिकारी मिनल पालांडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभागाकडून दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये खेळपट्टी, सीमारेषा, प्रेक्षागृह तसेच इतर आवश्यक ती सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत.


       यंदा विजय हजारे ट्रॉफीच्या पाच मॅच ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर होणार आहेत. ६ आणि ७ डिसेंबर,२०२१ रोजी या स्पर्धेतील सहभागी संघांचे सराव सत्र दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे होणार असून ८, ९, ११, १२ आणि १४ डिसेंबर,२०२१ रोजी प्रत्यक्ष सामने होणार आहेत. 

     

      ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर यंदा पाहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफीच्या रणजी सामने होणार असल्याने प्रशासनाच्यावतीने विशेष तयारी करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments