एस.एस.टी.च्या विद्यार्थीनीची राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई


कल्याण, प्रतिनिधी : मलकापुर बुलढाणा येथे झालेल्या राज्यस्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेत एस.एस.टी महाविद्यालयाची खेळाडू प्रांजली पगारे हिने यूथ गटात कांस्य पदकावर आपले नाव कोरले. या यशामुळे होतकरु खेळाडू  प्रांजलीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. एस.एस.टी. महाविद्यालयाचे विद्यार्थी स्पोर्ट्स मध्ये नेहमी चमकदार कामगिरी करत आलेले आहेतच आणि आता या यशाने पुन्हा हे विद्यार्थ्यांनी सिद्ध केले आहे.


प्रांजली च्या या यशा बद्दल एस.एस.टी. महाविद्यालयचे अध्यक्ष आणि संस्थापक प्राचार्य डॉ. जे. सी. पुरस्वानीउपप्राचार्य जीवन विचारे तसेच क्रीड़ा शिक्षक राहुल अकुल, पुष्कर पवार आणि मार्गदर्शकतसेच सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी तिचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments