अपहृत मुलांचा २ तासांच्या आत घेतला शोध महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनची कामगिरी


कल्याण  , कुणाल  म्हात्रे  : अपहृत मुलांचा २ तासांच्या आत शोध घेण्याची कामगिरी कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी केली आहे.  कल्याण पश्चिममेतील रामबाग नं. ४ या परिसरात राहणाऱ्या रजीता महेश मोटा या आपली १३ वर्षीय मुलगी खुशी आणि ९ वर्षीय मुलगा कृष्णा सह १५ दिवसांपूर्वी सायन कोळीवाडा येथून राहण्यास आल्या होत्या. गुरुवारी त्या कामानिमित्त मुंबई येथे गेल्या असता रात्री ७ च्या नंतर घरी आल्या असता त्यांना घराला कुलूप दिसले. त्यांची दोन्ही मुले दिसून न आल्याने त्यांनी त्यांचा आजूबाजूला शोध घेतला. तरीही मुले मिळून न आल्याने त्यांनी याबाबत महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. 

 
           या दाखल गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग दत्तात्रय कराळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ- ३, कल्याण . सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, कल्याण विभाग  उमेश माने पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी अपहरण झालेल्या दोन्ही मुलांचा शोध घेण्यासाठी फिर्यादी महिला यांच्याकडुन बारकाईने माहीती घेवुन वेगवेगळी पोलीस पथके तात्काळ तयार केली. फिर्यादी राहत असलेल्या परीसरात एक पथक, कल्याण जंक्शन रेल्वे स्टेशन येथे एक पथक, आंबिवली रेल्वे स्टेशन परीसरात एक पथक पाठवुन शोध सुरु केला.


        तसेच अपहरण झालेली मुले मुळ राहणार निजामाबाद, तेलंगना राज्य येथील असल्याने ते गावी देखील जाण्याचा अंदाज बांधुन कसारा, इगतपुरी, नाशिक रोड येथील जी.आर.पी/आर.पी.एफ तसेच ठाणे ग्रामीण, नाशिक ग्रामीण पोलीसांशी संपर्क साधुन त्यांना अपहरण झालेल्या मुलांच्या वर्णनासह माहीती दिली आणि महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याची पोलीस पथके कसारा व इगतपुरी रेल्वे स्टेशन येथे रवाना केली. 


           दरम्यान कसारा आर.पी.एफ.चे पोनि / हनुमान सिंह यांना माहीती दिल्यावरुन त्यांच्या पथकाने सदर अपहरण झालेली दोन्ही भावंडे मुलगा आणि मुलगी यांना इगतपुरी रेल्वे स्टेशन येथे देवगिरी एक्सप्रेस मधुन रात्री १२ च्या सुमारास सुखरुपपणे ताब्यात घेतले. या दोन्ही मुलांना त्यांची फिर्यादी आई  रजीता महेश मोटा यांचे स्वाधीन केले आहे. मुलांचे अपहरण झाल्याची माहीती प्राप्त होताच पोलीसांनी अत्यंत वेगवानपणे तपासाची चक्रे फिरवुन अपहरण झालेल्या दोन्ही मुलांचा २ तासांचे आत शोध लावुन अत्यंत संवेदनशिल असलेला गुन्हा उघडकीस आणला .


          ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या देखरेखी खाली पोनि  प्रदिप पाटील, सपोनि  सचिन पत्रे, पोलीस हवालदार कुंभार,  भालेराव, ठिकेकर, जाधव, गोत्राळ, जाधव,  दौड यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments