फुले दाम्पत्याच्या स्मारकाला मंजुरी ओबीसींनी केला आनंदोत्सव साजरा


ठाणे (प्रतिनिधी) ठाण्यात महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचं स्मारक उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.  ठाणे पालिकेचे सभागृह नेते अशोक वैती यांनी फुले दाम्पत्याचं स्मारक उभारण्याचा प्रस्ताव सभागृहात मांडला होता. त्यास मंजुरी मिळाली आहे.  हा प्रस्ताव मंजूर होताच सर्व ओबीसी बांधवांनी ठामपा मुख्यालयात आनंदोत्सव साजरा केला. प्रस्ताव मांडणारे अशोक वैती आणि दिलीप बारटक्के यांचा ओबीसी बांधवांनी सत्कार केला. 


          ओबीसी एकीकरण समिती आणि ठाणेकर नागरिकांनी महात्मा फुले आणि सावित्रीमाईंचं स्मारक ठाण्यात उभारण्याची मागणी लावून धरली होती. त्याला सोमवारी झालेल्या महासभेत मंजुरी मिळाली आहे त्यानंतर आज ठाणे महापालिकेच्या सभागृह नेते अशोक वैती यांच्या दालनात सर्व ओबीसी बांधवांनी सभागृह नेते अशोक वैती यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करीत पेढे भरवून आनंद उसव साजरा केला आहे.


           यावेळी प्रफुल वाघोले, सचिन शिंदे, राहुल पिंगळे, राज राजापूरकर, सचिन केदारी, सुभाष देवरे, राजाभाऊ चव्हाण आदींनी नगरविकास मंत्री पालकमंत्री एकनाथ शिंदे आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे महापौर नरेश म्हस्के,सभागृह नेते अशोक वैती, गटनेते दिलीप बारटक्के,विरोधी पक्षनेते शानु पठाण तसेच सर्व पक्षीय नगरसेवकांचे ओबीसी बांधवांनी आभार मानले आहे.

Post a Comment

0 Comments