कल्याण , प्रतिनिधी : महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेनुसार महापालिका परिसरात कायापालट अभियान राबविण्यास यापूर्वीच प्रारंभ करण्यात आला असून आता घनकचरा विभागाचे उपआयुक्त कोकरे यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली बिर्ला महाविदयालयाच्या विदयार्थ्यांनी प्रा. सुवर्णा जाधव यांच्या नेतृत्वाखाली पुनीत सागर अभियानाअंतर्गत दुर्गाडी परिसरातील गणेश घाट परिसर स्वच्छ करण्यास स्वेच्छेने व स्वयंस्फुर्तीने सुरुवात केली आहे.
या विदयार्थ्यांनी व नागरिकांनी काल प्लास्टिक पिशव्यांमध्ये टाकलेले निर्माल्य वेगवेगळे करून कंपोस्टिंग साठी जमा केले. प्लास्टिक, कागद, कापड, काच इ. वेगवेगळे संकलित करून पुर्नवापरसाठी पाठविले. हा उपक्रम यापुढे वर्षभर सुरु राहणार असून यामध्ये दररोज १० विदयार्थी/ विद्यार्थीनी सहभाग घेणार आहेत. या कच-याचे ओला/सुका कचरा याप्रमाणे वर्गिकरण करुन व निर्माल्य संकलित करून गणेश घाट यापुढे स्वच्छ, सुंदर व रमणीय ठेवला जाईल.
0 Comments