ट्रेलद्वारे 'द ग्रॅण्ड ट्रेलियन सेल'ची घोषणा

■ब्युटी, पर्सनल केअर आणि फॅशन श्रेणीतील ६०० हून अधिक ब्रॅण्डसवर ८० टक्क्यांपर्यंतची सूट ~

मुंबई, १७ डिसेंबर २०२१ : भारताचा सर्वात मोठा इन्फ्लुएन्सर-प्रणित लाइफस्टाइल सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म ट्रेलने ( Trell ) सर्वात मोठ्या ‘द ग्रॅण्ड ट्रेलियन सेल’ची घोषणा केली असून २० डिसेंबरपर्यंत हा महासवलत सोहळा भरणार आहे. ग्रॅण्ड ट्रेलियन सेलमुळे १० कोटींहून अधिक यूजर्सना ट्रेल शॉपवर ब्युटी, फॅशन आणि पर्सनल केअर श्रेणींमधील ६०० हून अधिक ब्रॅण्ड्सवर अतुलनीय आणि फायदेशीर सवलती मिळवता येणार आहेत.


      द ग्रॅण्ड ट्रेलियन सेलमध्ये केल्व्हिन क्लेन, डीकेएनवाय, मेबलीन, लॉरिएल, मनिष मल्होत्रा ब्यूटी, ममाअर्थ, एमकॅफिन, प्लम, बेअर अनाटॉमी, वॉव स्किन सायन्स, बेराडो, द मॅन कंपनी, एअरोपोस्टल, यूएस पोलो, फॅबअॅली, स्पायकर, आणि रेझिन यांसारख्या ब्रॅण्ड्सच्या उत्पादनांवर ८० टक्क्यांपर्यंतची सूट दिली जाणार आहे. शिवाय य सेलच्या पार्श्वभूमीवर कंपनीने वेला, श्वार्झकॉफ आणि एचयूएलचे लव्ह, ब्युटी अँड प्लॅनेट, स्पायकर, पेपे जीन्स, यूएस पोलो असे फॅशन, ब्युटी आणि पर्सनल केअर श्रेणीतले इतरही अनेक ब्रॅण्ड आपल्या मंचावर आणले आहेत.


    ट्रेलचे सीईओ आणि सह-संस्थापक पुलकित अग्रवाल म्हणाले, "या सणासुदीच्या मोसमामध्ये आमच्या १० कोटींहून अधिक शॉपर्सना केओएल कम्युनिटीने केलेल्या सर्वोत्तम शिफारशींनुसार खरेदी करण्याची आणि ब्युटी, पर्सनल केअर आणि फॅशन क्षेत्रातील ६०० हून अधिक ब्रॅण्ड्सची उत्पादने अतुलनीय सवलतीच्या दरात खरेदी करण्याची संधी देणारा 'द ग्रॅण्ड ट्रिलियन सेल' हा आमचा प्रमुख सेल ग्राहकांच्या भेटीला घेऊन येत असल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. 


         ट्रेलने ग्राहकांच्या गरजा समजून घेण्यासाठी आणि ट्रेल कॅश अँड वॉचलिस्टसारख्या आमच्या सध्या सुरू असलेल्या मूल्यात्मक प्रस्तावांसारखे उद्योगक्षेत्रातील पहिलेवहिले प्रयोग राबविण्याच्या दृष्टीने ग्राहकांच्या साथीने एक विश्वासार्ह मार्ग निर्माण केला आहे. या सेलद्वारे आम्ही सेलच्या दरम्यान मोठ्या संख्येने होणा-या शिपमेंट्सचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि ग्राहकांना विनाअडथळा व वेळच्यावेळी डिलिव्हरीज मिळण्याचा अखंड अनुभव देण्यासाठी आपल्या पुरवठा साखळीचे नेटवर्क अधिकच भक्कम केले आहे."


       याखेरीज ट्रेल कॅश हे आपले इन-अॅप चलन दाखल करण्यासाठी ट्रेलने एक डिजिटल फिल्मसुद्धा प्रसिद्ध केली आहे. सर्वसाधारणपणे सेल सुरू होण्याच्या आधी शॉपर्स आपल्या आवडत्या उत्पादनांची 'विशलिस्ट' तयार करतात, पण मेटाव्हर्सच्या या काळाशी मेळ साधत ट्रेलने हीच गोष्ट वेगळ्याच उंचीवर नेली आहे आणि यूजर्सना द ग्रॅण्ड ट्रेलियन सेलच्या दरम्यान अधिकाधिक सवलत मिळविण्यासाठी जास्तीत-जास्त व्हिडिओंची 'वॉचलिस्ट' तयार करण्याचे आमंत्रण देऊ केले आहे.


          भारतात पहिल्यांदाच यूजर्सना खरेदीच्या एखाद्या मंचावर व्हिडिओज पाहून, कॅश जिंकून ती खरेदीसाठी वापरता येणार आहे. भारतीय रुपयाच्या सममूल्य असलेली ही ट्रेल कॅश मिळविण्यासाठी यूजर्सना अॅपवरील काही माहितीपर आणि मनोरंजक व्हिडिओज पाहता येतील. ट्रेलच्या या अनोख्या योजनेमध्ये यूजर्सना व्हिडिओज पाहणे, मित्रमंडळींना या अॅपवर आमंत्रित करणे, ट्रेल शॉपवर खरेदी करणे अशी निरनिराळी कामे करण्यासाठी इनाम दिले जाईल. या इनामाच्या मोबदल्यात त्यांना ट्रेल कॅश वापरून अॅपवर खरेदी करण्याची संधी मिळेल. याखेरीज यूजर्सना सेलदरम्यान खरेदी केलेल्या वस्तूंच्या किंमती आणखी कमी करण्यासाठीही या ट्रेल कॅशचा वापर करता येईल.

Post a Comment

0 Comments