कल्याण रेल्वे स्थानका जवळच्या पदपथांनी घेतला मोकळा श्वास


कल्याण, प्रतिनिधी  :   कल्याण मधील महम्मद अली चौक,रेल्वे स्थानक  या परीसरात असणाऱ्या सततच्या वर्दळीमुळे नागरिकांना सदर परिसरात चालणे जिकीरीचे होऊन जाते,त्यामुळे नागरिकांना पदपथांवरून चालणे सुलभ व्हावे या दृष्टीकोनातून महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या स्पष्ट निर्देशानुसार आज क प्रभागाचे सहा. आयुक्त सुधीर मोकल यांनी,महात्मा पोलीस स्थानकातील पोलीसांच्या व महापालिका कर्मचारी पथकाच्या मदतीने शिवाजी चौक ते मोहम्मद अली चौक , गुरुदेव हॉटेल जवळील रस्ता, छाया टॉकीज परिसर या ठिकाणी बसणाऱ्या फेरीवाल्यांना हटवून सदर रस्ते  पूर्णपणे मोकळे केल्यामुळे,या रस्त्यांवरील नागरिक,दुचाकीस्वार मोकळ्या रस्त्यांवरून आनंदाने मार्गक्रमण करताना दिसत होते.

Post a Comment

0 Comments