संविधान साक्षर असणे आवश्यक - चंद्रशेखर भारती

■“माझे संविधान माझी जबाबदारी" लेखस्पर्धेचा पारितोषक वितरण संपन्न...


कल्याण , प्रतिनिधी  : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व संविधान गौरव दिनानिमित्त माझे संविधान माझी जबाबदारी" लेखस्पर्धेचा पारितोषक वितरण सोहळा सार्वजनिक वाचनालय कल्याणच्या सभागृहात पार पडला. संविधानाने अनेक अधिकार बहाल केले आहेत. आपण त्याची अंमलबजावणी योग्य रीतीने केली पाहिजे असे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ठाणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील यांनी मांडले.


 

संविधान साक्षर असणे आवश्यक आहे. विकेंद्रीकरण पद्धतीचे व अद्वितीय असे भारतीय संविधान असून अनेक जाती,धर्मात आपण विभागले गेलो असलो तरी संविधानामुळे आपण एकसंध आहोत, महिलांनी हिंदू कोडवील वाचावे त्यात महिला स्वातंत्र्याचे महत्व विशद केलेले आहे असे प्रतिपादन विशेष अतिथी व लेख परीक्षक चंद्रशेखर भारती यांनी केले.


 

छोट्या गटात वृंदा पवार, जुई नवले, जिया जाधव, वैष्णवी कल्याणकर, आयुषी विधे. मोठ्या गटात आसावरी लेलेशुक्राचार्य गायकवाडवैशाली नारखेडे, रंजना शिंदेबाळकृष्ण धुरीमुग्धा घाटे या विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांनी प्रास्ताविक केले.व्यासपीठावर कार्यकारिणी सदस्या नीलिमा नरेगलैंकर, परीघा विधाते, अरविंद शिंपी उपस्थित होते. सूत्रसंचालन सह. ग्रंथपाल करुणा कल्याणकर यांनी केले. तर अनेक साहित्यकार, ग्रंथपाल गौरी देवळे, ग्रंथसेविका तसेच वाचनालयाचा वाचकवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याची माहिती भिकू बारस्कर यांनी दिली.

Post a Comment

0 Comments