कॉंग्रेसच्या वतीने किल्ले स्पर्धा २०२१ संपन्न

 


डोंबिवली ( प्रतिनिधी ) डोंबिवली शहर ( प) ब्लॉक कॉंग्रेस कमिटीच्या वतीने पार पडलेल्या किल्ले स्पर्धा २०२१ मध्ये नवगावदेवी कृपा सोसायटी – सिद्धेश घाडीगावकर ( विशालगड – पन्हाळा- ) तर धर्मात्मा सोसायटी ( सिंधुदुर्ग ) यांना सर्वोत्कृष्ट किल्ला २०२१ म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.


         कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष केणे, डोंबिवली शहर ( प) ब्लॉक कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष एकनाथ म्हात्रे व डोंबिवली विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष पमेश म्हात्रे यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.  याप्रसंगी बी ब्लॉक कार्याध्यक्ष शरद भोईर, महिला उपाध्यक्षा सुजाता परब, जिल्हा सरचिटणीसराहुल केणे, विद्याधर दळवी, ब्लोक अध्यक्ष  ( दिवा ) मयूर भगत आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments