रेल्वेसह सबंधित विभागाच्या सहकार्याने वाहतूक कोंडीची समस्या सोडविणार : पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी वाहतूतिच्या समस्येचा आराखडा तयार


कल्याण, प्रतिनिधी  :  कल्याण स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडीसह  शहरातील अनेक ट्राफिक जंक्शनवरील कोंडी फोडण्यासाठी वाहतूक जंक्शन तयार करण्याचे नियोजन सुरु असून स्मार्ट सिटी प्रकल्पातून तयार होणारा सटीस प्रकल्प देशातील उल्लेखनीय प्रकल्प असून दुसरीकडे कल्याण डोंबिवलीत अनेक वर्षांनी सुरु झालेली सिग्नल यंत्रणा इतर शहराच्या मानाने खूपच प्रगत आणि उल्लेखनीय आहे.         शहरातील वाहतुकीच्या समस्या अनेक असून त्याला सर्वच घटक जबाबदार आहेत. सर्वांनी हि कोंडी फोडण्याची जबाबदारी आपली आहे याचे भान ठेऊन काम केले तर शहराचा सुनियोजित पद्धतीने विकास करणे अशक्य नसल्याचे मत पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी मांडले. कल्याण डोंबिवली प्रिंट मिडिया असोसीएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना या विषयावर ते बोलत होते.     या परिसंवादात आयुक्तां समवेत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटीलसहाय्यक पोलीस आयुक्त मंदार धर्माधिकारीउपप्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाणपरिवहन महाव्यवस्थापक डॉ दीपक सावंतशहर अभियंता सपना कोळी- देवनपल्लीनगररचनाकार दिशा सावंतवाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडेउमेश गित्तेपालिका सचिव संजय जाधवजनसंपर्क अधिकारी माधवी पोफळेवास्तूविशारद राजीव तायशेटेप्रवासी संघटनेचे प्रतिनिधी मनोहर देशमुखसचिन गवळीसामाजिक संघटनेचे प्रतिनिधी विजय भोसलेरिक्षा संघटनेचे प्रतिनिधी शेखर जोशीसंतोष नवलेशारदा ओव्हळयासह पालिकेचे अधिकारीनागरिक आणि रिक्षा चालक उपस्थित होते.

 


यावेळी पुढे बोलताना आयुक्तांनी शहरात बसविण्यात आलेल्या सिग्नल वर इ चालन सिस्टीम पुढील काही दिवसात सुरु केली जाणार असून वाहनचालकांनी वाढलेल्या दंडाची रक्कम विचारात घेऊन नियमाचे उल्लघन करू नये असे आवाहन वाहन चालकांना केले. फुटपाथ वरील डीपी हटविण्याचे प्लानिग सुरु असून रिक्षाचे थांब्याचे सर्व्हे पूर्ण झाला आहे. पि१.पि२ पार्किंगचे टेंडर प्रसिद्ध केले जाणार असून मल्टीलेव्हल पार्किंगसाठी जागा निश्चित करण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी संगीतले. एकीकडे पालिका परिसर विकसित करत असताना रेल्वे देखील रेल्वे स्टेशनचा विकास करणार असल्याने पुढील ३ वर्षात या भागाचा कायापालट झालेला असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.तर  नियम मोडणाऱ्या दुचाकीवरच नव्हे तर चारचाकीवर देखील ठोस कारवाई केली जावी वाहतूक पोलिसांनी काळजी घ्यावी अशा सूचना करतानाच अबोली रिक्षा चालकासाठी स्वतंत्र स्टन्ड उपलब्ध करून देण्याचे आश्वासन तानाजी चव्हाण आणि आयुक्तांनी दिले.  वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी शहरात ९.५ लाख नोंदणीकृत वाहने असून ६४ हजार रिक्षांना परवाने देण्यात आल्याची माहिती देतानाच रिक्षांना अधिकृत थांबे ठरविले जाणार असल्याचे सांगितले. तर वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक स्वयंसेवक नेमले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या स्टेशन परिसरात काम सुरु असल्यामुळे  रेल्वे स्थानकातील बंद करण्यात आलेले स्टन्ड  पुन्हा सुरु करण्यासाठी रेल्वे प्रशासनाशी बोलून प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.तर जड वाहनाना  दुपारी १२ ते ४ पर्यत शहरांना प्रवेश करता येणार असून या वेळेत हि वाहने थांब्विण्य्साठी ट्रक टर्मिनन्सची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील सीसीटीव्ही प्रकल्पाचे कौतुक करताना त्यांनी सिग्नल तोडणार्या वाहनचालका बरोबरच गुन्हेगारांना आळा घालणे शक्य होणार असल्याने हा प्रकल्प इतर शहराच्या मानाने खूप चांगला असल्याचे म्हटले.      नागरिकाच्या वतीने उपाययोजना सुचविताना राजीव तायशेटे यांनी रस्त्याच्या फुटपाथवर झालेले अतिक्रमणरस्त्यावरील पार्किंगरिक्षा स्टन्ड सह एकत्रित वाहनांना रस्त्यावर मार्किंग होणे आवश्यक आहे. फेरीवाल्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. उखडलेले पेव्हरब्लॉक निट बसवा यासारख्या उपाययोजना प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मांडल्या.         रिक्षा संघटनेच्या प्रतिनिधीनी आणि सामाजिक संघटनाप्रवासी प्रतिनिधीनि देखील आपल्या समस्या मांडतानाच स्टेशन परिसरातील कोंडी फोडण्यासाठीच्या उपाययोजना मांडल्या. संतोष नवले यांनी स्टेशन परिसरातील रिकाम्या जागा रिक्षा स्टन्डसाठी मिळाव्यात अशी मागणी केली तर शेखर जोशी यांनी मुक्त परमीट बंद करण्याची मागणी केली.  अबोली रिक्षा साठी स्टन्ड मिळावे कारण आम्हाला व्यवसाय करण्यासाठी जागाच नाही असे रक्षा शिंदे यांनी सांगितले.          डॉ दीपक सावंत यांनी वाहतूक कोंडीवर उपाययोजना सुचवताना नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक सुविधेला प्राधन्य देण्याचे आवाहन केले.  तर तानाजी चव्हाण यांनी  मीटरला प्रवाशाकडून प्रतिसाद मिळत नाही. दंडाची रक्कम वाढल्याने नागरिकांनी नियमाचे उल्लघन करताना दंड किती भरावा लागेल याचा विचार करा असे आवाहन केले.


तर शहर अभियंता सपना कोळी यांनी शहरात ५०० नो पार्किंग बोर्ड आणि ट्राफिक सिग्नल बोर्ड लावले आहेत. वाहतूक कोडीचे जंक्शन रुंदीकरण करत असल्याचे सांगताना रस्त्याच्या सर्व्हेसाठी आयआयटी ची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्याकडून रोड सेफ्टी ओडीट केले जाणार आहे. जंक्शन कुठे वाढवता येतीलवाहतूक कोंडीचे नियोजनअपघात रोखण्यासाठी काय करणे अपेक्षित आहे याबाबत अहवाल मिळणार असून त्याच्यावर काम केले जाईल ज्यामुळे स्मार्ट सिटीचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडी फुटेल असा विश्वास व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments