डोंबिवलीत काँग्रेस कार्यालयाची तोडफोड..अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी..


डोंबिवली ( शंकर जाधव )  येथील पूर्वेकडील स्टेशनजवळील काँग्रेसच्या कार्यालयाची अज्ञात इसमांनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे.या घटनेने कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.घटनेची माहिती मिळताच काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी  कार्यालयाची पाहणी केली.कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या अज्ञात इसमांवर पोलिसांनी तात्काळ  गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात  आली आहे.


          52 वर्ष जुने असलेले डोंबिवलीतील काँग्रेस  कार्यालयाचा दरवाज्याची कडीकोयंडा तोडून अज्ञात इसमांनी तोडफोड केली.या घटनेची माहिती मिळताच काँग्रेस पदाधिकारी संतोष केणे, नवेंदू पाठारे, अशोक कापडणे, वर्षा शिखरे, संजय पाटील,एकनाथ म्हात्रे यांनी कार्यालयाकडे धाव घेतली. या घटनेने कार्यकर्ते प्रचंड संतापले होते. 


        ही घटना अत्यंत गंभीर असून तोडफोड करणाऱ्यांना पोलिसांनी अटक करावी अशी मागणी केल्याचे यावेळी कॉंग्रेस पदाधिकारी संतोष केणे यांनी केली.दरम्यान काँग्रेस कार्यालय तोडण्यामागे अज्ञात इसमांचा नेमका काय हेतू असावा ? यामागे कोणाचं हात आहे ? कार्यालय तोडून कोणाला फायदा होणार आहे ? याची सखोल चौकशी पोलिसांनी केल्यास वास्तविक समोर येईल.

Post a Comment

0 Comments