सूर्या रोशनीने २१ भारतीय स्‍मारकांच्‍या प्रतिकृतींना रंग बदलणा-या आरजीबी लाइट्ससह केले प्रकाशमय


मुंबई, ३० डिसेंबर २०२१ : सूर्या रोशनी या भारतातील लायटिंग, होम अप्‍लायन्‍सेस, स्‍टील पाइप्‍स व पीव्‍हीसी पाइप्‍ससाठी सर्वात विश्‍वसनीय ब्रॅण्‍डने भारत दर्शन पार्क, पंजाबी बाग, नवी दिल्‍ली येथे निर्माण करण्‍यात आलेल्‍या भारतभरातील २१ स्‍मारकांच्‍या लहान प्रतिकृतींना प्रोग्राम केलेल्‍या व रंग बदलणा-या स्‍मार्ट आरजीबीडब्‍ल्‍यू दर्शनी लाइट्ससह प्रकाशमय केले आहे.


      सूर्या रोशनी लिमिटेड या प्रकल्पात संकल्पना तयार करण्यापासून ते साइटच्या अंमलबजावणीपर्यंत लोकांना दैदिप्‍यमान अनुभव देणा-या  स्मार्ट कलर-चेंजिंग लाइट्सच्या प्रोग्रामिंगसह संलग्‍न होती.


        दक्षिण दिल्‍ली महानगरपालिकेच्‍या अधिपत्‍यांतर्गत निर्माण करण्‍यात आलेले पार्क दिल्‍ली सरकारचा 'वेस्‍ट टू वंडर' उपक्रम आहे आणि सर्व प्रतिकृती भंगार व टाकाऊ साहित्‍यापासून बनवण्‍यात आल्‍या आहेत. भारताचे माननीय गृहमंत्री व सहकार मंत्री श्री. अमित शाह भारत दर्शन पार्कच्‍या उद्घाटन समारोहाप्रसंगी प्रमुख अतिथी होते.


     पार्क येथे स्‍थापित करण्‍यात आलेल्‍या २१ स्‍मारकांच्‍या प्रतिकृती आहेत ताजमहाल (उत्तर प्रदेश)म्हैसूर पॅलेस व हंपी मंदिरे (कर्नाटक)नालंदा विद्यापीठचार धामकुतुबमिनारखजुरावव्हिक्टोरिया पॅलेस (पश्चिम बंगाल)चारमिनार (तेलंगणा)अजिंठा व एलोरा लेणीगेटवे ऑफ इंडिया (महाराष्ट्र)कोणार्क मंदिर (ओडिशा)सांची स्तूप (मध्य प्रदेश)मोहब्बत का मकबरा (गुजरात)तवांग गेट (अरुणाचल प्रदेश)गोल गुम्बाझ (कर्नाटक)हवा महलमीनाक्षी मंदिर (तामिळनाडू) आणि बोधी वृक्ष (बिहार).


       भारत दर्शन पार्क २२ महिन्‍यांमध्‍ये निर्माण करण्‍यात आले असून ते ८.५ एकर परिसरावर पसरलेले आहे. जुने ऑटोमोबाइल पार्टस्, लोखंडी सळ्या, वापरलेले पंखे व वीजेचे खांब इत्‍यादींसारख्‍या ३५० मेट्रिक टन टाकाऊ साहित्‍याचा वापर करत हे पार्क निर्माण करण्‍यात आले आहे.

Post a Comment

0 Comments