सर्प मित्राने दिले २ सापांना जीवदान


कल्याण, कुणाल  म्हात्रे  : कल्याण पश्चिमेतील उंबर्डे, वाडेघर गावातून दोन सापांना रेसक्यु करीत सर्पमित्राने जीवनदान दिले.                                                   मानवी वस्त्यांमध्ये सापांचा वावर वाढला असून जंगलातील नैसर्गिक अधिवासात रहिवास करणारे साप अवकाळी पावसामुळे हवेत आलेल्या गारव्यामुळे  काँक्रीटच्या जंगलात फिरकत आहेत. साप आढळत असल्याने सर्पमित्र कमीत कमी वेळेत घटनास्थळी पोचून या सापना जीवदान देण्याचा प्रयत्न करतात.    

                                                                            


           कल्याण पश्चिमेतील उंबर्डे गावात शुक्रवारी दुपारच्या सुमारास लोखंडे यांच्या घराच्या परसदारात असलेल्या जुन्या मासे पकडण्याच्या जाळ्यात अडकलेल्या साडे सहाफुटी लांब सापाला पाहुन लोखंडे कुटुंबीयांची भांबेरी उडाली. घटनास्थळी सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी तातडीने पोहचत जाळ्यात अडकलेल्या साडेसहाफुटी बिनविषारी धामण प्रजातीच्या सापास पकडून धामण सापाबद्दल उपस्थितामध्ये जनजागृती करीत जीवनदान दिले.          तसेच शुक्रवारी दुपारच्या सुमारास    वाडेघर गावातील मयुरेश कापसे यांच्या बंगल्यामागे वेटोळे घालून बसलेल्या तब्बल आठफुटी लांब धामणीस पकडून जीवनदान दिल्याचे पाहून उपस्थितांच्या जीवात जीव आला. सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी जीवनदान दिलेल्या दोन्ही धामण सापास वनपाल एम डी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक अधिवासात सोडले.

Post a Comment

0 Comments