६७% विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या आधारा शिवाय गणिताचे प्रश्न सोडविताना अडचणी : ब्रेनली ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म्स ठरतात उपयुक्त ~


मुंबई, २१ डिसेंबर २०२१ : गणित हा विद्यार्थ्यांमध्ये अत्यावश्यक जीवनकौशल्ये अंगी बाणण्यास मदत करणारा बहुधा सर्वाधिक मनोवेधक विषय आहे. मग ते कौशल्य विश्लेषणात्मक विचारांचे असो, प्रश्नांची उकल करण्याचे असो, बारकाईने विचार करणे असो किंवा परिमाणांबद्दलची तर्ककुशलता असो. मात्र कोव्हीड-१९ दरम्यान उद्भवलेल्या परिस्थितीमुळे प्रत्यक्ष शाळा अचानक बंद पडून दूरस्थ पद्धतीने शिक्षण सुरू झाल्याने गणित हा विषय विद्यार्थ्यांना अवघड वाटू लागला. ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म ब्रेनलीने गणित दिनाच्या औचित्य साधून केलेल्या सर्वेक्षणातून हीच बाब समोर आली आहे.


        ब्रेनलीच्या ताज्या पाहणीनुसार ६७% विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या आधाराशिवाय गणितातील प्रश्न सोडविणे कठीण वाटत आहे. ६९% विद्यार्थ्यांना ऑफलाईन पेक्षा ऑनलाईन गणित शिकणे अधिक आव्हानात्मक वाटते आहे. सुदैवाने तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत ऑनलाइन लर्निंग संसाधनांमुळे विद्यार्थ्यांना वेगाने उत्क्रांत होत असलेल्या शिक्षणाच्या संकल्पनेशी जुळवून घेणे शक्य होत आहे.


      कोव्हिडमुळे निर्माण झालेल्या जगण्याच्या नव्या व्यवस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्या गणिताशी असलेल्या नात्याचा वेध या सर्वेक्षणाद्वारे घेण्यात आला. सुमारे १७०० विद्यार्थ्यांनी या सर्वेक्षणात आपली मते नोंदवली. गणिताचा अभ्यास आपल्याला आवडत असल्याचे दर चारपैकी तीन विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.


ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म्स मार्गदर्शक:


       ऑनलाइन माध्यमाचा वापर करणा-या अध्ययनपद्धतीने पॅनडेमिकच्या काळात विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू ठेवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि शाळा सुरू होत असतानाही पूरक साहित्य म्हणून अध्यापनाला ऑफलाइन शिकवणीची जोड दिली जात आहे. अभिनव आणि संवादात्मक पद्धतीने शिकविणा-या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म्समुळे विद्यार्थ्यांसाठी गणित शिकणे खूपच सोपे झाल्याचे ब्रेनलीच्या सर्वेक्षणातून अधोरेखित झाले आहे. या पाहणीच्या निष्कर्षांनुसार ७४% विद्यार्थ्यांना ब्रेनलीसारखे प्लॅटफॉर्म्स गणिताशी निगडित प्रश्न सोडविण्यासाठी उपयुक्त वाटत आहेत.


     ब्रेनलीचे मुख्य उत्पादन अधिकारी श्री राजेश बायसानी म्हणाले, "ब्रेनलीमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना गणित सोडविताना, विशेषत: घरून गणिताचा अभ्यास करताना कोणत्या अडचणी येतात हे पुरेपूर जाणतो. हीच गरज पूर्ण करण्यासाठी ब्रेनलीने ब्रेनली मॅथ्स सॉल्वर (Math Solver) हे साधन विद्यार्थ्यांच्या भेटीला आणले आहे, जे गणितातील सर्वाधिक गुंतागुंतीच्या समस्यांवरील उत्तरे शोधण्याच्या कामी मदत करते. 


       ज्या विद्यार्थ्यांना गणित विषय समजून घेण्यात अडचणी येत आहेत, किंवा त्यासाठी काही मार्गदर्शन हवे आहे अशा विद्यार्थ्यांनी गणिती संकल्पना पक्क्या करण्यासाठी आणि या विषयात प्राविण्य मिळविण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करणा-या व गणितांचे तपशीलवार स्पष्टीकरण पुरविणा-या या साधनाचा लाभ जरूर घ्यावा."

Post a Comment

0 Comments