सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर लालचौकी येथील सिग्नल सुरु


कल्याण , प्रतिनिधी  : कल्याण डोंबिवली शहरातील विविध ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र लालचौकी येथील सिग्नल काही दिवस बंद असल्याने याबाबत सामाजिक कार्यकर्ते भूषण पवार यांनी पालिका आयुक्तांना तक्रार करताच हे सिग्नल सुरु करण्यात आले आहेत.


कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवड ही १०० शहरातून स्मार्ट सिटी योजने अंतर्गत झाली आहे. त्यानुसार महानगरपालिका ह्यांनी शहरात विकासाच्या कामाला सुरुवात केली असून त्यात प्रामुख्याने शहरातील वाहतूक यंत्रणांवर जास्त भर दिला होता आणि ह्याच समस्येला अनुसरून कल्याण शहरात ट्राफिक सिग्नल लावले आहेत. 


मात्र काही दिवस योग्य प्रकारे चालल्यानंतर कल्याण पश्चिम येथील लाल चौकी येथील सिग्नल अकार्यक्षम झाले होते सोबतचं काही सिग्नल ह्यांचा डिस्प्ले सुद्धा खराब झाला होता. ट्राफिक सिग्नल खराब झाल्याने कित्येक वाहतूक दार वाहतूक कोंडी करून समस्या निर्माण करत होते. हि बाब सामाजिक कार्यकर्ते भूषण पवार या तरुणाच्या लक्षात आल्यावर सामाजिक कर्तव्याचे भान राखत त्वरित ही तक्रार कल्याण डोंबिवली महानगर पालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांना केली होती.


आयुक्तांनी या गोष्टींची त्वरित दखल घेत तक्रारीच्या दुसऱ्याच दिवशी मागील कित्येक दिवसापासून बंद असलेली ट्राफिक सिग्नल यंत्रणे मध्ये प्राण फुंकून नवसंजीवनी दिली. तसेच ट्राफिक सिग्नल यंत्रणा पुन्हा कार्यान्वित केल्या मुळे समस्त कल्याण डोंबिवली मधील नागरिकांच्या वतीने भूषण पवार यांनी आयुकांचे आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments