ओबीसी आरक्षणासाठी केंद्र शासना विरोधात कॉंग्रेसची निदर्शने


कल्याण, प्रतिनिधी  : ओबीसी आरक्षणासाठी कॉंग्रेस आक्रमक झाली असून कल्याण मध्ये केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सचिव प्रकाश मुथा यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष जयदीप सानप यांच्या पुढाकाराने कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन केले.


         ओबीसी आरक्षण नाही तो पर्यंत कोणत्याही निवडणुका घेऊ नये त्या करिता केंद्र शासनाच्या विरोधात लोकशाही मार्गाने काळी पट्टी बांधून झेंडे बॅनर वापरून कॉंग्रेसच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करत करण्यात आला.  पोलिसांनी परवानगी नाकारल्याने रस्ता रोको आंदोलन न करता आंदोलन करण्यात आले. आरक्षण नाही तो पर्यंत निवडणूक घेऊ नयेत हि प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत  लवकरच दिल्ली जंतर मंतर येथे आंदोलन करण्यात येणार असून याबाबत  तहसीलदारांमार्फत भारत सरकार, निवडणूक आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे.


         मध्य प्रदेशातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात  ट्रिपल टेस्ट जजमेंट चॅलेंज करणार आहे आणी दरम्यानच्या काळात देशभरात ओबीसी राजकीय आरक्षण चालू ठेवावे यासाठी  लवकरच याचिका दाखल करणार आहे. ही माहिती केंद्र सरकारनेच  प्रसिद्धीपत्रक काढून दिली आहे. हीच  तत्परता महाराष्ट्रातील ओबीसींच्या आरक्षणाच्या वेळी का दिसून आली नाही असा सवाल कल्याण जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष जयदीप सानप यांनी केला आहे

                 
            ओबीसींना न्याय देण्यासाठी केंद्र पुढाकार घेत असेल तर ते स्वागतार्हच आहे. परंतु महाराष्ट्रातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारने अलिकडेच दाखल केलेल्या याचिकेला याच कृष्णमुर्ती प्रकरणामुळे धक्का लागला होता. महाराष्ट्रातील राज्य सरकारच्या याचिकेच्यावेळी मौन बाळगायचे, इम्पेरिकल डेटा न देण्याची नकारात्मक भूमिका घ्यायची, याचिका फेटाळल्यानंतर महाराष्ट्रातील ओबीसींना मदत करण्यासाठी तातडीने काहीच करायचे नाही आणि मध्य प्रदेशची याचिका फेटाळल्याबरोबर थेट कृष्णमुर्ती निवाड्याला आव्हान देण्याची तयारी करायची, हा दुजाभाव असल्याचा आरोप  सानप यांनी केला.
         

           यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जनरल सेक्रेटरी प्रकाश मुथा, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी लखपत सिंह राजपूत, महाराष्ट्र ओबीसी सचिव संगीता भोईर, ओबीसी जिल्हाध्यक्ष जयदीप सानप, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कल्याण प राजा जाधव, कल्याण पू बाळा बर्वे, डोंबिवली निवृत्ती जोशी, डोंबिवली ग्रामीण सूर्यकांत मंडपे, उप अध्यक्ष चंद्रकांत पाटील, स्वप्नील छत्तीसकर, सचिव माणिक सानप, संघटक हाफिज कुरेशी, नितीन चौधरी, रियाज शेख, अनिल पवार, जावेद शेख, प्रसिद्धी प्रमुख कोणार्क देसाई, जावेद मुल्ला, शफीक शेख आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments