ब,जे आणि ई प्रभागात अनधिकृत पणे लावलेल्या बॅनर्स पोस्टर्स वर निष्कासनाची धडक कारवाई !


कल्याण , प्रतिनिधी : कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या  निर्देशानुसार कायापालट अभियाना अंतर्गत आज ब प्रभागात सहा. आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी आपल्या कर्मचारी वर्गासह निक्की नगर वायलेनगर, खडकपाडा, वसंतव्हॅली या ठिकाणी अनाधिकृतपणे लावलेले 30 बॅनर्स, पोस्टर्स निष्कासित करण्याची धडक कारवाई केली.

 
            महापालिकेच्या जे प्रभागातही सहा.आयुक्त हेमा मुंबरकर यांनी आज पुनालिंक रोड, तिसगाव, पत्रीपूल, टाटा पॉवर परिसरातील 22 बॅनर्स होर्डिग्ज आणि 12 झेंडे निष्कासित करण्याची कारवाई केली. ई प्रभागातही सहा.आयुक्त भरत पवार यांनी कल्याण शिळ मार्गावरील 35 मोठे व 60 लहान बॅनर्स, होर्डिग्ज निष्कासित करण्याची कारवाई केली. हि कारवाई या पुढेही सुरु राहणार आहे.

Post a Comment

0 Comments