विनोद शेलकर यांना खान्देशरत्न भास्कराचार्य आदर्श शिक्षक पुरस्कार


कल्याण , प्रतिनिधी  : उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळातर्फे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपील पाटील यांचा भव्यदिव्य नागरी सत्कार करण्यात आला.  तसेच विनोद शेलकर यांनी बनवलेले त्यांचे सुंदर कॅनव्हास पेंटिग भेट  म्हणून देण्यात आले. पेंटिंग त्यांना खूप आवडली. आपल्या सारखे  आदर्श शिक्षक असतात म्हणून गुणवंत विद्यार्थी घडतात.  शिक्षकांनीही असेच कालसुसंगतनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करत शिक्षण द्यावे असे कपिल पाटील यांनी सांगितले.


सत्कारसमारंभाचं औचित्य साधून आहिराणी भाषा संवर्धनासाठी अतुलनीय योगदान देणारे मंडळाचे खजिनदार ए. जी. पाटीलक्रीडा शिक्षक ईश्वर पाटील व ज्येष्ठ पत्रकार आणि श्रेष्ठ छायाचित्रकार दिपक जोशी यांचाही प्रातिनिधीक स्वरुपात सन्मान करण्यात आला. यावेळी प्रज्ञावंतगुणवंतकिर्तीवंत खान्देशी गुरुवर्यांना खान्देशरत्न भास्कराचार्य आदर्शशिक्षक पुरस्कार २०२१ ने सन्मानित करण्यात आल.


विनोद शेलकर यांच्या कर्याचीही दखल घेण्यात आली. विनोद शेलकर हे गुरुनानक इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज कल्याण पश्चिम येथे कलाशिक्षक असून, आविष्कार एज्युकेअर फाऊंडेशन, एनजीओ च्या माध्यमातून गरजू, वंचित व्यक्तींसाठी त्यांचे काम सुरू असते. 


भाजपा शिक्षक आघाडीचे ते कोकण विभाग कार्यवाह असून शिक्षकांचे विविध प्रश्न सातत्याने मांडण्यासाठीसोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात. श्री संत सावता माळी युवक संघाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग असतो. त्यांच्या या कार्याची दखल विविध समाज मंडळेसामाजिक संस्था नेहमी घेत असतात.  


त्यामुळे आतापर्यंत ७५ च्या वर नॅशनलराज्यस्तरीयजिल्हास्तरीय पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल प्राचार्य बलजित कौर मारवाहपर्यवेक्षक अर्चना तिवारीसमाज बांधव यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments