शरद महोत्सवात उद्घाटनाला पंतप्रधान मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो झळकला..

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली पूर्वेकडील नेहरू मैदान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या शरद महोत्सवाच्या उदघाटन  प्रसंगी व्यासपीठावरील चित्रफितावर 
पंतप्रधान मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो झळकला.एकदा नव्हे तर दोनदा हा प्रकार घडूनही राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे याकडे लक्ष गेले नाही.


          प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वागताची तयारी सुरू असताना हा प्रकार घडल्याने कार्यकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविषयी राष्ट्रवादिला इतके प्रेम आल्याने हा चर्चाचा विषय झाला आहे.

Post a Comment

0 Comments