डिजिटल करन्सी हा देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका - कॉम्रेड विश्वास उटगी दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा समारोप


कल्याण , प्रतिनिधी : डिजिटल करन्सी हा देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका असल्याचे मत बँकिंग तज्ञ व ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड विश्वास उटगी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन कल्याण परिमंडळाचे वतीने दोन दिवसाचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर ठाकूर फार्महाऊसउत्तरर्शिव बदलापूर येथे संघटनेचे सरचिटणीस कॉम्रेड कृष्णा भोयर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी सरकारी बँकांचे खाजगीकरण व त्यांचें भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम या विषयावर बँकिंग तज्ञ व ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड विश्वास उटगी यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.


शिबिरात संबोधित करताना कॉमेंड उटगी म्हणाले की, केंद्र सरकारने नवीन डिजिटल करन्सीचा कायदा केला असूननवीन करन्सी देशभर लागू करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. नवीन करन्सीचा मालक कोण आहे, हे जनतेला माहीत नाही. देशातील सरकारी बँकातून भांडवलदार कर्ज घेऊन त्या बँकांची लुट करत असूनबऱ्याच बॅंका ह्या तोट्यात गेलेल्या आहे व अनेक बँका बंद करण्यात आलेल्या आहे. डिजिटल करन्सीचा जर वापर वाढला तर भारतीय रुपयाचे मूल्य कमी होणार आहे. त्याचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार असून भारतीय अर्थव्यवस्था भविष्यात डबघाईस आल्याशिवाय राहणार नाही.


डिजिटल करन्सी ही जागतिक पातळीवर काम करणारी करन्सी असून भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर परकिय भांडवली गुंतवणूक करायला सुरुवात झालेली आहे. शेअर मार्केट मध्ये जागतिक भांडवलदारांची इन्व्हेस्टमेंट आहे.ती अचानक काढून घेतल्या जाईल व रुपयाचे मूल्य कोसळेल व भारतीय अर्थव्यवस्था कमकुवत होईल. जगातील प्रगतशील राष्ट्राचे हे षडयंत्र असून भारताला कमजोर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारच्या लक्षात ही बाब का येत नाही हे मोठे आश्चर्य असल्याचे उटगी यांनी सांगितले.


          प्रशिक्षण शिबिरास मंजू वर्मा यांनी महिला वरील अत्याचार व त्या विरोधात आपण कसे लढले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. संघटनेचे उपसरचिटणीस कॉ. अरुण मस्के यांनी विद्युत कायदा २०२१ चे सामान्य जनता,शेतकरी व वीजग्राहक यांच्यावर होणारे परिणाम याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.कॉम्रेड लिलेश्वर बनसोड यांनी आपण आंदोलन अन्यायाच्या विरोधात कसे केले पाहिजे,आंदोलना मध्ये घोषणा कशा पद्धतीने दिल्या पाहिजे याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. संयुक्त सचिव कॉम्रेड औदुंबर कोकरे यांनी प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमाने कार्यकर्ता घडविता येतो व चळवळ मजबूत करण्याकरता त्याचा उपयोग होतो अशा शिबिराची अत्यंत आवश्यकता आहे असे प्रतिपादन केले.

Post a Comment

0 Comments