कल्याण , कुणाल म्हात्रे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार कर्नाटक मध्ये घडला होता. या घटनेचा निषेध राष्ट्रवादी, शिवसेनेकडून करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून महाराजांना दुधाचा अभिषेक करण्यात येत आहे. कल्याण मध्ये देखील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांच्या नेत्तृत्वाखाली पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला.
यावेळी कर्नाटक सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कर्नाटक मध्ये आमच्या आराध्य दैवताची विटंबना केली त्याचा निषेध करतो. भाजपचा मुख्यमंत्री असलेल्या या राज्यात भाजपने विष पेरण्याचे काम केले. या विषवल्लीचा निषेध करतो. महाराजांचा ज्यांनी अपमान केला त्याचा बदला घेतल्या शिवाय राहणार नाही असा इशारा यावेळी सुधीर पाटील यांनी दिला.
0 Comments