अवकाळी पावसामुळे झाडांची पडझड

 


कल्याण, कुणाल  म्हात्रे  : काल पासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे कल्याण डोंबिवलीत काही ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. कल्याण पश्चिमेतील बीएसएनएल ऑफिसजवळ झाडाची फांदी विजेच्या तारेवर पडली. तर डोंबिवली एमआयडीसी मध्ये देखील गुलमोहराचे झाड पडल्याची घटना घडली असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली.


डोंबिवली एमआयडीसी मिलापनगर येथील पोटोबा पोळी भाजी केंद्र समोर एक गुलमोहोरचे मोठे झाड गुरुवारी पहाटे अडीच तीन सुमारास महावितरणच्या डीपी बॉक्स व स्कूल मिनी बस वर पडले. त्यामुळे परिसरातील वीज पुरवठा आज सकाळ पर्यंत बंद होता. हे झाड दोन बंगल्यासमोर पडल्यामुळे त्यातील रहिवाशांना आपल्या वाहनासहीत बाहेर पडता आले नाही. झाड पडल्यामुळे महावितरणच्या डीपी बॉक्स दाबला गेला असून स्कूल बसचा थोड्या प्रमाणात पत्रा दाबल्याने थोडे नुकसान झाले आहे.


येथून जवळच काल रात्री एका केबलला आग लागल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यात हे मोठे झाड महावितरणच्या बॉक्सवर पडल्याने पुन्हा वीज पुरवठा बंद झाला होता. हे झाड पडल्याचे सकाळी फायर ब्रिगेड यांना कळविण्यात आल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments