अभिनय कट्टा ठाणे व इनरव्हिल क्लब ऑफ ठाणे वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती


ठाणे, प्रतिनिधी  :  चित्रकला स्पर्धा व बक्षीस समारंभ  याचे आयोजन ५०४ क्रमांकाच्या अभिनय कट्ट्यावर करण्यात आले आजच्या युवा युवतींना दुर्देवाने लागलेल्या विविध  व्यसनांच्या सवयी व त्यामुळे होणारे दुष्परिणाम, आपल्या संस्कृतीच्या होणारा ऱ्हास तसेच सुखी जीवनात या व्यसनामुळे होणारे परिणाम या सर्वांवर मात करण्याच्या दृष्टीने  व्यसनमुक्तीसाठी जनजागृती म्हणून ही चित्रकला स्पर्धा घेण्यात आली  असे मत किरण नाकती यांनी व्यक्त केले.


         या स्पर्धेत तीन वेगवेगळ्या वयातील विद्यार्थ्यांनी हजेरी लावली पहिली ते पाचवी, सहावी ते दहावी व दहावीच्या  पुढील खुला गट प्रत्येक गटात प्रथम पाच पारितोषिक व उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आली प्रसंगी इनरव्हिल क्लब ऑफ ठाणे वेस्टच्या अध्यक्षा कनक जयवंत ,सेक्रेटरी दिप्ती गोखले, परीक्षक उज्वला बेके, चारु श्रीराम तसे दिव्यांग कला केंद्राच्या संचालिका संध्या नाकती उपस्थित होत्या. चित्रकला स्पर्धेतील चित्रपट बघताना सिगारेट, तंबाखू व मद्यपान त्याचे होणारे दुष्परिणाम या कठीण विषयावरील चित्रं काढलेली   बघून मन हेलावून गेले.


        या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक केले. प्रत्येक स्पर्धकांना भेटवस्तू व खाऊ देण्यात आला.या कार्यक्रमात संगीत कट्ट्याच्या गायक कलाकार अपना वाड़देकर, अनंत मुळे ,मनीषा रानडे ,अंजली संत ,अंजली बोरवले, यांनी बालगीते सादर करून बालगोपाळामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण केले.या चित्रकला स्पर्धेत इनरव्हील क्लब ऑफ ठाणे वेस्ट ची माहिती देत या स्पर्धेला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल  अध्यक्ष कनक जयवंत यांनी समाधान व्यक्त केले. इनरव्हील क्लब ऑफ ठाणे वेस्ट च्या वतीने दिव्यांग कला केंद्राच्या विद्यार्थ्याना कॅसिओची भेट देण्यात आली.


          साई घोरपडे ,धीरज शर्मा कार्तिक झंझाड,श्रेया कांबळे हार्दिक मोरेकर, अनुष्का जाधव ,रोशनी निमोले ,सृष्टी भोसले, रेणूसिया पाठक ,साक्षी म्हाडसे, दृष्टी मोरे भूषण तांबे, मधुरा सामंत,हिमानी फावरे ,वरुण पूजेला ,प्रथमेश वाघदरे पियुषा जाधव यांनी चित्रकला स्पर्धेत पारितोषिके पटकावली तसेच मेधा सचिन निकम ,मधुरा गणेश नाकते, नेहा सकपाळ, निनाद कदम ,धनश्री उतेकर ,यश घाणेकर, प्रफुल नवघणे चेतन वनगले, ऋतुराज खापरे यांना रांगोळी स्पर्धेत पारितोषिके मिळाली.

Post a Comment

0 Comments