कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश


कल्याण , प्रतिनिधी : कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी सुदाम पाटील आणि ताहीर पटेल यांनी नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशाबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पनवेल शहर उपाध्यक्ष आर. एन. यादव यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.


सुदाम पाटील आणि ताहीर पटेल यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशासाठी जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. खासदार सुनील तटकरे यांनी मुंबई कार्यलयात या  दोन्ही पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश करून घेतल्याबद्दल आर. एन. यादव यांनी त्यांचेही विशेष आभार मानले. यावेळी अनिल नाईक, जितेंद्र यादव, मनोरंजन सिंह, कृष्णा सिंह, कीर्ति यादव, पांडेय आदि कार्यकर्ते उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments