अखेर त्या वादग्रस्त अनधिकृत इमारतीवर पालिकेची पुन्हा कारवाई

■डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर परिसरातील तळ+5 मजली अनधिकृत इमारतीवर निष्कसनाची कारवाई...


कल्याण, प्रतिनिधी  : अखेर त्या वादग्रस्त अनधिकृत इमारतीवर पालिकेने पुन्हा कारवाईचा बडगा उगारला आहे. डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर परिसरातील तळ+5 मजली अनधिकृत इमारतीवर निष्कसनाची कारवाई कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आली आहे.

 
             महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार व विभागीय उपायुक्त पल्लवी भागवत  यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागक्षेत्र ग अंतर्गत दत्तनगर डोंबिवली पूर्व, येथील विकासक प्रफुल्ल गोरे यांच्या  शिव दत्तकृपा या तळ + 5 मजल्याच्या इमारतीचे अनधिकृत बांधकाम रहिवास मुक्त करून  आज  निष्कासनाच्या कारवाईस सुरूवात करण्यात आली आहे.  हि निष्कासनाची कारवाई  रामनगर पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी सचिन सांडभोर व पोलिस कर्मचारी , अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने  करण्यात येत आहे. 


          कारवाई  फ प्रभागाचे सहा.आयुक्त किशोर शेळके,  ग प्रभागाच्या सहा. आयुक्त रत्नप्रभा कांबळे, क प्रभागाचे सहा. आयुक्त सुधीर मोकल, ह प्रभागाचे सहा. आयुक्त अक्षय गुडधे , इ प्रभागाचे सहा आयुक्त भारत पवार, प्रभाग अधिक्षक दिनेश वाघचौरे , प्रभाग अधिक्षक ज्ञानेश्वर कंखरे ,प्रभाग अधिक्षक शंकर धावारे यांचे  उपस्थितीत आणि  1जाॅ क्रशर मशीन,  1 पोकलेन, 1 जेसीबी , 10 मजूर यांच्या सहाय्याने करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments