नगरसेवक उमेश पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने खारीगाव स्मशान भूमीचे कामाचे नूतनी करण


कळवा, अशोक घाग :  प्रभाग क्रमांक 9 चे नगरसेवक उमेश पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने खारीगाव स्मशानभूमी कामाचे नूतनीकरण चा शुभारंभ दि 17/12 2021 रोजी स्थानिक नगरसेवक उमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला त्याप्रसंगी उपविभाग प्रमुख रवींद्र पाटील युवा नेते राकेश पाटील साने गुरुजी वाचनालय अध्यक्ष गजानन पवार रचना राकेश पाटील महिला आघाडी अध्यक्ष पुष्पलता भानुशाली दर्शना जगताप शिवणेकर स्मिता अहिरे अर्चना पाटील इतर उपस्थित होते


        याप्रसंगी नगरसेवक उमेश पाटील म्हणाले की खारेगाव पारसिक नगर घोलाई नगर वास्तू आनंद आनंद विहार संपूर्ण डोंगर पट्टा येथील लोकसंख्या जवळजवळ दीड ते दोन लाख आहे खारेगाव परिसरामध्ये एकमेव स्मशानभूमी आहे एक किंवा दोन बॉडी आणल्यानंतर नागरिकांना इथे बराच वेळ थांबावे लागते त्यामुळे मी स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार एकनाथ शिंदे आणि महापौर नरेश म्हस्के यांना खारेगाव स्मशानभूमी करिता बजेट देणे गरजेचे आहे कोरोना च्या काळामध्ये गॅस विद्युत वाहिनी सुरू केलेली नव्हती त्यामुळे मृत्यू देह कळवा ठाणे येथे न्यावे लागले  स्मशानभूमी मधील वॉल कंपाऊंड पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत आहे कोणत्याही प्रकारचा प्रवेश द्वार नाही.


           स्मशानभूमी खाडीकिनारी असल्यामुळे पावसाळ्यामध्ये तर अत्यंत बिकट परिस्थिती असते कारण जवळजवळ दोन ते तीन फूट स्मशानभूमी मध्ये पाणी येते लोकांना बसण्यासाठी साधे बाकडे सुद्धा नाहीये यासंदर्भात नागरिकांनी तक्रार केल्या तक्रारीची दखल घेऊन या संदर्भामध्ये   महापौरांकडे पाठपुरावा केला व मुळे तो ठराव मंजूर झालेला आहे त्यामुळे आज कामाला सुरुवात करण्यात आली आहे

Post a Comment

0 Comments