सि.पी. टॅकमधील डम्पिंग ग्राउंड म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण विरोधी पक्षनेते शानू पठाण यांचा आरोप


ठाणे (प्रतिनिधी)-  कचरावेचकांच्या आड वागळे इस्टेट येथील डम्पींग ग्राऊंड येथील ठेकेदार लाखो रुपये कमवित आहेत. मात्र, याच ठेकेदारांच्या फायद्यासाठीच ठामपा प्रशासनाकडून सीपी टँक येथील डम्पिंग ग्राउंड हटविण्यात येत नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी केला. 


          वागळे इस्टेट येथील सी. पी. टँक येथे गेल्या अनेक वर्षांपासून एक डम्पिींग ग्राऊंड आहे. या ग्राउंडवर वर्षोनुवर्षे कचरा टाकला जात आहे. पालिकेकडून या ठिकाणी कचर्‍याचे वर्गीकरण करुन ते डम्पगि ग्राउंडवर टाकले जात असल्याचे सांगण्यात येत असले तरी या जागेचा वापर डम्पिंग ग्राउंडसाठीच वापर केला जात असल्याचे नमूद करुन ठामपा मुख्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. 


         या नागरिकांनी शानू पठाण यांची भेट घेऊन या संदर्भात तोडगा काढण्याची विनंती केली होती. त्याानुसार पठाण यांनी पालिका अधिकार्‍यांसह सदर ठिकाणी पाहणी दौरा आयोजित केला होता. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला. त्यांसोबत राष्ट्रवादीचे युवाध्यक्ष विक्रम खामकर हे उपस्थित होते. 

 

          वागळे इस्टेट येथील डम्पिंग ग्राउंडचा विषय गंभीर आहे.  या ठिकाणी कचर्‍याचे वर्गीकरण केले जात असल्याचे अधिकार्‍यांकडून सांगितले जात आहे. जर या ठिकाणी केवळ वर्गीकरणच होत असेल तर दोन मजल्यांपर्यंत कचर्‍याचे ढिग जातातच कसे, असा  सवाल करुन पठाण यांनी सांगितले की, दिव्यातील डम्पिंगचा प्रश्न निकाली काढण्यासाठी 20 लाख रुपये भाडेतत्वावर भूखंड घेण्यात आलेला आहे. त्यामुळे याच ठिकाणी जर ठाण्यातील हा कचरा टाकला तर वागळे इस्टेट येथील समस्या निकाली निघणार आहे. 


         मात्र, ठेकेदार कचरावेचकांच्या माध्यमातून स्वत:ची झोळी भरत आहेत.कचरावेचकांकडून  12 रुपये किलोने भंगार   घेऊन त्याद्वारे लाखो रुपये कमाई ठेकेदार करीत आहेत. या संदर्भात आपण पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड,  महापौर नरेश म्हस्के,  आयुक्त, ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे यांच्याशी चर्चा करुन तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र, ठेकेदारांची मस्ती अशीच काायम राहिली तर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस या भागात एकही कचर्‍याची गाडी येऊ देणार नाही, असा इशाराही पठाण यांनी यावेळी दिला.

Post a Comment

0 Comments