कल्याण , प्रतिनिधी : विवाह जुळवणे अत्यंत जिकिरीचे काम असून यासाठी वधू वर परिचय केंद्र चालवणारयांचे कौतुक केले पाहिजे असे मत व्यक्त करत लोकांनी आपल्या मुलांचे विवाह जमविण्यासाठी अशा केंद्रांचा उपयोग करावा असे आवाहन राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी येथे केले.
अनिल काकडे संचलित आयुष मॅट्रिमोनी हया विवाह संस्थेच्या आणि कोरोनाच्या संकटकाळात लोकांना मदत करण्यासाठी स्थापन झालेल्या कोरोना समुपदेशन समितीच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बबनराव घोलप बोलत होते. याप्रसंगी महानगरपालिकेच्या कोविड रूग्णालयाचे व्यवस्थापक म्हणून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल किरण वाघमारे आणि रोहिणी लोकरे या अधिकारयांचा सत्कार देखिल बबनराव घोलप यांच्या हस्ते करण्यात आला.
अनिल काकडे यांचे वधू वर क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय असून त्याबद्दल राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आम्ही सत्कार केला असे सांगून बबनराव घोलप पुढे म्हणाले कि विवाह जुळवणे हे पुण्याईचे काम आहे. गेली अनेक वर्ष अनिल काकडे हे काम करत असल्याने आम्ही त्यांची दखल घेतली. यापुढे देखिल त्यांनी आपले काम नेटाने पुढे चालू ठेवावे. राष्ट्रीय चर्मकार महासंघ त्यांना याकामी सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन दिले.
0 Comments