शनिवारी कल्याण पूर्वेत भव्य वधु -वर सुचक मेळावा

 


कल्याण , प्रतिनिधी :  लग्न करण्याच्या प्रतिज्ञेत असलेल्या इच्छुक युवा - युवतींसाठी कल्याण पूर्वेत शनिवारी भव्य विनामुल्य वधु वर सुचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे .


        गेली अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्री सिद्धी विनायक वधु - वर सुचक मंडळाच्या आयोजनाने आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात सर्व जाती धर्मातील इच्छुक वधु वरांसह घटस्फोटीत, दिव्यांग, विधवा, विधूर, यांनाही आपल्या पसंतीचा वधु - वर निवडण्यासाठी विनामुल्य प्रवेश असून मेळाव्यात कीमान १०० जोडप्यांचे श्रुणांनुबंध जोडण्याचे उद्दीष्ठ असल्याचे या मेळाव्याचे प्रमुख आयोजक  प्रशांत काळे यांनी सांगितले . 


        कोळसेवाडीतील गायत्री विद्यालया जवळ असलेल्या महाड तालुका मराठा समाज सेवा संघाच्या सभागृहात शनिवार दि . २५ डिसेंबर रोजी सकाळी  ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत हा मेळावा संपन्न होणार असून अधिक माहितीसाठी  9819966278/8850469090  या मोबाई नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments