कल्याण , कुणाल म्हात्रे : नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका राबवित असलेल्या विविध उपक्रमांबरोबरच आयुक्तांनी सार्वजनिक स्वच्छतेवरही भर दिला असून चाळ, झोपडपट्टी परिसरात रहिवास करणा-या नागरिकांना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये याकरीता सदर परिसरातील सार्वजनिक शौचालयांची पाहणी करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिका-यांना यापूर्वीच दिले आहेत.
त्याअनुषंगाने क प्रभागाचे सहा. आयुक्त सुधिर मोकल यांनी आरोग्य निरिक्षक जगन्नाथ वड्डे यांचेसह कल्याण स्थानकाजवळील तसेच रेल्वे टिकीट आरक्षण केंद्राजवळील सार्वजनिक शौचालयाची पाहणी केली आणि या परिसरात असणारी सततची वर्दळ व त्यामुळे सदर शौचालयाचा होणारा वापर लक्षात घेता, ही शौचालये स्वच्छ ठेवणेबाबत सुचना दिल्या.
0 Comments