संजय नागांवकर यांना मुंबई विद्यापीठाची पीएचडी

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) भिवंडी तालुक्यातील आठगाव विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय कोन या शाळेतील गणित विषयाचे शिक्षक संजय हनुमान नागांवकर यांना शिक्षणशास्त्र विषयात मुंबई विद्यापीठाची पीएचडी मिळाली आहे. संजय नागांवकर  हे डोंबिवलीकर असून त्यांनी `माध्यमिक शाळांतील गणित विषयातील विद्यार्थ्यांची भावनिक बुद्धिमत्ता,शैक्षणिक अभिरुची आणि व्यक्तिमत्व घटक यातील सहसंबंधाचा अभ्यास` विषयावर प्रबंध सादर केला होता.त्यांना डॉ. नागांवकरराव यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments