मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट

 

■मुंबई विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची भेट घेतली सोबत अतिरिक्त आयुक्त(1) संदीप माळवी, नगर अभियंता अर्जुन अहिरे, विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी आदी.


ठाणे , प्रतिनिधी  :  मुंबई विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी आज महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची भेट घेवून मुंबई विद्यापीठाच्या ठाणे येथील उप केंद्रासाठी बस सेवा, स्थापत्य कामे तसेच इतर अत्यावश्यक त्या सर्व बाबींवर सविस्तर चर्चा केली. 


      यावेळी अतिरिक्त आयुक्त(1) संदीप माळवी, नगर अभियंता अर्जुन अहिरे, विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.


      ठाण्यात मुंबई विद्यापीठाने सुरू केलेल्या उपकेंद्राचा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. सद्यस्थितीत उप केंद्राकडे ये-जा करण्यासाठी बस सेवा सुरू करण्याबाबत तसेच इतर अत्यावश्यक स्थापत्य कामे करण्याबाबत कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी सुचविले आहे. यावेळी ठाणे महापालिकेच्यावतीने उप केंद्रासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी नमूद केले. 

Post a Comment

0 Comments