५५५ रिक्षा चालकांचा वैद्यकीय आणि अपघाती विमा


कल्याण, प्रतिनिधी : रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन कल्याण शहर अध्यक्ष प्रणव प्रकाश पेणकर यांच्या प्रयत्नाने व रुची सामाजिक संस्था वंदना लोखंडे यांच्या सहकार्याने कल्याण शहर पुर्व, पश्चिम येथे रिक्षा टॅक्सी चालकांसाठी साडेपाच लाख रुपयांचा वैद्यकीय उपचार व अपघात विमा योजना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तीन दिवसात रिक्षा चालंकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. यामध्ये ५५५ रिक्षाचालकांचा विमा काढण्यात आला.  


      आधी दोन दिवस आयोजित केलेल्या या शिबिरात साडेचारशे रिक्षाचालकांनी वैद्यकीय उपचार व अपघात विमा योजना लाभ घेतला. रिक्षा टॅक्सी चालकांच्या आग्रहास्तव व जास्तीत जास्त रिक्षा टॅक्सी चालकांना मोफत वैद्यकीय उपचार व अपघात विमा योजनेचा लाभ मिळावा या करिता शिबिराची मुदत एक दिवसासाठी वाढवली होती. याचा लाभशंभर हून अधिक रिक्षाचालकांनी घेतला. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी विलास वैद्यजितु पवारसंतोष नवलेशगीर शेखबंडु वाडेकरआदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments