एमजी मोटर इंडियाने एनएफटी मधील प्रवेशाची घोषणा केली

एनएफटी लाँच करणारी भारतातील पहिली कारउत्पादक कंपनी ~

 

मुंबई, १९ डिसेंबर २०२१: एमजी मोटर इंडियाने नॉन-फंगिबल टोकन (एनएफटी) मधील प्रवेशाची घोषणा केली आहे. यासह ब्रिटीश ब्रॅण्ड एनएफटीचे कलेक्शन लाँच करणारा भारतातील पहिला कारमेकर बनला आहे. लाँच कलेक्शनचा भाग म्हणून ११११ युनिट्स डिजिटल क्रिएटिव्ह्जसोबत एमजी एनएफटी

कलेक्शनच्या विक्रीला २८ डिसेंबर दुपारी १२ वाजल्यापासून सुरूवात होईल. ऑटोमेकर विशेषत: एमजी व्यवहारांसाठी सानुकूल करण्यात आलेल्या कॉईनअर्थच्या एनगेजएन व्यासपीठावर पदार्पणीय एनएफटी सादर करेल.

 


         स्थापनेपासून एमजी मोटरने चार मुलभूत आधारस्तंभांवर (वैविध्य, अनुभव, समुदाय व नवोन्मेष्कारी) भर दिला आहे. आपल्या विश्वासाला अधिक दृढ करत एमजीचे एनएफटी ४ सी(C)" विभागांमध्ये विभागण्यात येईल: कलेक्टेबल्स, कम्युनिटी अॅण्ड डायव्हर्सिटी, कोलॅबोरेटिव्ह आर्ट आणि सीएएपी (कार-अॅज-ए-प्लॅटफॉर्म).

 


        एमजी मोटर इंडियाचे गौरव गुप्ता म्हणाले, "ऑटो-टेक ब्रॅण्ड म्हणून एमजीने नेहमीच नवोन्मेष्काराला प्राधान्य दिले आहे. या नवीन उपक्रमासह आम्‍ही एनएफटीचे सामाजिकीकरण करण्याच्या दिशेने पाऊल उचलत आहोत. या परिवर्तनासह एमजी मालक, चाहते, एमजीसीसी सदस्‍य आणि व्यापक समुदाय एकत्र येऊन अनेक प्रकारांमधील बहुमूल्य डिजिटल क्रिएटिव्ह्जना साजरे करण्यासाठी स्वत:च्या मालकीचे बनवतील. आम्ही एनएफटीमधील आमच्या प्रवेशासाठी कॉईनअर्थसोबतच्या आमच्या विद्यमान संबंधाला अधिक दृढ करत आहोत. या पहिल्याच विक्रीमधून मिळणारे उत्पन्न एमजी सेवा अंतर्गत सामुदायिक सेवांसाठी वापरण्यात येईल."

 


       कॉईनअर्थचे संस्थापक प्रफुल चंद्रा म्हणाले, "एमजी मोटरसोबत त्‍यांच्या एनएफटीमधील पदार्पणामध्ये आमचा सहयोग आमच्यासाठी उत्साहवर्धक क्षण आहे. कॉईनअर्थमध्ये आम्ही विश्वसनीय एनएफटीच्या माध्यमातून सर्वात लोकप्रिय ब्रॅण्ड्ससाठी अविरत वारसा निर्माण करण्याशी कटिबद्ध आहोत. एमजीसोबतचे आमचे कलेक्शन रूपयांमध्ये असण्यासोबत जीएसटीसह प्रमाणित असतील.     ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करणा-या ग्राहकांना प्रमाणीकरणाचे अद्वितीय प्रमाणपत्र देण्यात येईल. आम्ही ब्रॅण्डसोबत लाभदायी सहयोगासाठी, तसेच एनएफटी गतीला अधिक पुढे घेऊन जाण्यासाठी उत्सुक आहोत.

एनएफटी भावी सहयोगात्मक तंत्रज्ञानासाठी खरे गुरूकिल्ली असतील."

Post a Comment

0 Comments